-->
रस्ते,खड्डे,अपघात आणि मृत्यू हेचि कर्म फळ!..

रस्ते,खड्डे,अपघात आणि मृत्यू हेचि कर्म फळ!..




"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी.

जळगाव :- जळगाव शहरातील लोकांना जळगाव शहरातील रस्ते कामाचे ठेकेदारांनी रस्ता कामातून डांबर सिमेंट चोरले‌.चोरलेल्या पैशातून मतदारांना रोख पैसे मिळालेले आहेत.म्हणून खड्डे तर पडणारच.खड्ड्यात पडून अपघात होणारच.अपघात होऊन हातपाय मोडणारच.डोके फुटणारच.माणसे मरणारच.हा कर्म फल सिद्धांत आहे.जरी अपघात ग्रस्त झालेले लोक म्हणत असतील कि,आमचे कर्म चांगले म्हणून आम्ही वाचलो.खोटे बोलत आहात.तुमचे कर्म चुकीचे होते म्हणून अपघात झाला आहे.
     तुम्ही म्हणाल, आम्ही मरता मरता वाचलो आणि तुम्ही आम्हाला ग्यान पाजत आहात.हो! तुम्हाला ग्यान पाजण्याची गरज आहेच.कारण आज तुम्ही संभ्रमात आहात कि अपघात का आणि कसा झाला?जसा अर्जुन पझल झाला होता.तेच ग्यान मी पंधरा वर्षांपासून गल्ली बोळात जाऊन पाजत आहे.हरिविठ्ठल नगर मधे सुद्धा!पण तुमचा आजार या ग्यान घुटी पेक्षा जास्त भयंकर आहे.
     तुम्ही नगरसेवक उमेदवार कडून पैसे घेतात आणि मत देतात.तो निवडून येतो.हे सत्य का लपवत आहात?हेच तर खरे कारण आहे रस्ते खराब होण्याचे.हेच तर खरे कारण आहे खड्डे पडण्याचे.हेच तर खरे कारण आहे अपघात होण्याचे.हेच तर खरे कारण आहे हातपाय मोडण्याचे आणि डोकी फुटण्याचे.हेच तर खरे कारण जळगाव मधील अनेक बाया माणसे पोरं अपघाताने मरण्याचे.
    मी स्पष्ट बोलतो.तुमचे अपघात होऊ नये म्हणून प्रयत्न करतो.पण तुम्ही तर ऐकायला तयार नाहीत.ऐकले तरी समजायला तयार नाहीत.तुम्ही नगरसेवक उमेदवार कडून पैसे घेतात.अगदी त्यांच्या घरी जाऊन मतदान कार्ड गहाण ठेवतात.हजार रूपये घेतात.त्याच उमेदवाराला तुम्ही मतदान करतात.तेच मतदान कार्ड तुम्हाला बुथवर मिळते.तुम्ही खुश होतात.हा मुर्खपणा नाही का?
   ताई माई आक्का,भाऊ दादा काका तुम्ही मत विकले आहे तर मत विकत घेणारा हे पैसे आणणार कोठून?तो बापाची शेती घर विकून आणतो कि बायकोचे दागिने मोडून देतो?ए मावशी! हे पैसे रस्ता कामातूनच डांबर, सिमेंट चोरुन आणलेले आहेत.म्हणून खड्डे पडलेले आहेत.म्हणून तुमचा अपघात झाला आहे.तुम्ही कितीही रडले,अश्रू गाळले तर फक्त सहानुभूती मिळू शकते.सुरक्षा नाही.मोडलेले हातपाय आणि फुटलेले डोके परत मिळणार नाही.जोपर्यंत तुम्ही मत विकणे थांबवणार नाहीत.
     सरळ सरळ सांगतो,हा मत विकण्याचा परिणाम आहे.विका मत आणि मरा खड्ड्यात.याला कार्य कारण भाव म्हणतात.तुमचा अपघात होणे कर्माचे फळ आहे.याला कर्मफल सिद्धांत म्हणतात. मी फक्त आठवण करून देतो.हे भगवद्गितेत भगवान श्रीकृष्ण सांगतो.भगवत गीता मानतात कि नाही? श्रीकृष्णाला भगवान मानतात कि नाही?कि फक्त नगरसेवकाला भगवान मानतात?जो तुमचे मत विकत घेतो.तुम्हाला मताचे पैसे देतो.
    माझे मित्र जळगाव मधे राहातात.जळगांव महानगरपालिका मधून रिटायर झाले आहेत.मला चांगले ओळखतात.माझे कामाचे कौतुक पण करतात.पण त्यांना माझ्या कामाच्या ठिकाणी येण्यासाठी पांच मिनिटे फुरसत मिळाली नाही.पण मुलांचा अपघात झाल्यानंतर दोन महिने मुलांसाठी पुर्ण वेळ दिला.शिवाय वीस लाख दवाखान्यात खर्च केले.ते वेगळे.
     जळगाव शहरातील या मतविक्री मुळे खड्डे पडले.अपघात झाले ‌.अनेक डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी नोकर मजूर अपघाताने मेलेत.पण अजूनही सुबुद्धी येत नाही.ते अजूनही रस्ता कामातून डांबर,सिमेंट,माप चोरणाऱ्यांना भगवान मानतात.भेटले कि पाया पडतात.म्हणतात, तुम्ही आले बरे वाटले.पण मी म्हणतो,असे म्हणा कि, तुमच्यामुळे खड्डे पडले .बरे झाले,आम्ही खड्ड्यात पडून जायबंदी झालो.मेलो असतो तर आणखी बरे वाटले असते.
      जळगाव शहरातील आणि जिल्ह्यातील मी एकटा माणूस रस्त्यावरील खड्डे बाबत ओरडतो,काम करवून घेतो.मी एकटा माणूस आहे,जो निवडणूकीत मतदारांना मतांबद्दल पैसे देत नाही.म्हणून हे सत्य सांगण्याचे मी धाडस करतो.माझ्या श्रीकृष्णाने कुरू क्षेत्रावर भर युद्धाच्या रणांगणात अर्जुनाला भगवत गीता सांगितली होती.तिच मी रोज जळगाव मधील रस्त्यावर उभे राहून सांगतो. नगरसेवकांनो !तुम्ही रस्त्यावर खड्डे पाडा.मत विकणाऱ्या मतदारांना अपघाताने मारा.ती तुमची जबाबदारी आहे.घ्या मक्ते आणि बनवा खराब रस्ते .रस्त्यावर खड्डे!कारण येथे जळगाव शहरातील मुर्ख माणसे मरणार आहेत.ज्यांनी तुम्हाला मतदान केले आहे.
     

.. शिवराम पाटील 
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच 
जळगाव

0 Response to "रस्ते,खड्डे,अपघात आणि मृत्यू हेचि कर्म फळ!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article