-->
रस्ता सुरक्षा अभियानात निधी समरीतचे सुयश.

रस्ता सुरक्षा अभियानात निधी समरीतचे सुयश.



"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
 
सेंदूरवाफा :- रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत वर्ग ५ ते वर्ग ८ गटात साकोली तालुक्यातून जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा पिंडकेपार येथील निधी कृष्णराव समरीत हिने तृतीय क्रमांक पटकावला.

नुकत्याच पलाडी, भंडारा येथे उपप्रादेशिक परिहन मंडळाच्या वतीने आयोजित पारितोषिक

अधिकारी, वितरण सोहळ्यात उप प्रादेशिक परिवहन नियंत्रक अधिकारी जाधव यांच्या हस्ते, त्यांचे अधिनस्थ जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, प्राथमिकचे रविंद्र सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, मुख्या. राजेश सूर्यवंशी, केंद्रप्रमुख बी. जी. भुते तसेच तिचे वडील कृष्णराव समरीत, आई प्रिया समरीत यांच्या उपस्थितीत हा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.

0 Response to "रस्ता सुरक्षा अभियानात निधी समरीतचे सुयश."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article