उमरी येथे गोठ्याला आग; पाच लाखांचे नुकसान.
रविवार, 8 फ़रवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तिरोडा :- ता. ७ ला तालुक्यातील उमरी येथे नंदकिशोर कृष्णाजी नागपुरे यांच्या गोठ्याला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या आगीत अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नागपुरे यांच्या असलेल्या गोठ्यात गुरांसाठी साठवून ठेवलेला कडबा, सुका चारा, लाकूड तसेच शेतीसाठी वापरण्यात येणारे काही साहित्य ठेवले होते. दुपारी गोठ्यातून धुराचे लोट दिसू लागल्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. जोरदार वाऱ्यामुळे आगीचा भडका उडून घराशेजारी
काही वेळातच संपूर्ण गोठा आगीच्या भक्षस्थानी पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या बादल्या, मोटार पंप व विहिरीतील पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गोठा पूर्णतः जळून खाक झाला होता. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती महसूल विभाग व पोलिस प्रशासनाला देण्यात आली असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
0 Response to "उमरी येथे गोठ्याला आग; पाच लाखांचे नुकसान."
एक टिप्पणी भेजें