-->
पहेला येथील ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा सभा ठरली वादळी.

पहेला येथील ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा सभा ठरली वादळी.



• ग्रामस्थांनी अनेक विषयाला धरून तहकूब ग्रामसभेत ठराव केले पारित 

• ठरावाची अंमलबजावणी होणार किंवा नाही याकडे संपूर्ण गावकऱ्यांचे लक्ष?

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
  
भंडारा:- तालुक्यातील पहेला येथील तहकूब ग्रामसभा ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 ला दुपारी 12 वाजता ग्रामपंचायतच्या परिसरात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी अनेक विषयावर आवाज उचलून ग्रामपंचायत मध्ये ठराव घेण्यास भाग पाडले. ग्रामपंचायत ची मुदत लवकरच 15 फेब्रुवारीला 2026 संपत असून ही शेवटची ग्रामपंचायतची शेवटची तहकूब ग्रामसभा वादळी ठरली. सभेत ग्रामस्थांनी खालील प्रमाणे विषय मांडले. प्रामुख्याने नागरी सुविधा अंतर्गत दुकान चाळे बांधकामाची चौकशी करण्यात यावी, जिल्हा विकास निधी अंतर्गत सध्या स्थितीत कॉन्ट्रॅक्टदाराकडून ग्रामपंचायतच्या चाळीचे बांधकाम करण्यात येत असून जिल्हा ग्रामीण विकास निधी कडून कर्ज प्राप्त मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायत कडून देयके देण्यात येतील, बस स्टॉप समोरील अतिक्रमण हटविण्याबाबत, मधुबन अमन लॉजिंग यांना नोटीस तामील करण्याबाबत, ग्रामपंचायतच्या अधिनिस्त असलेल्या खाली जागा मोजणी करून ग्रामपंचायतच्या ताब्यात घेण्याबाबत, पंजाब बार ना मंजुरी करिता ग्रामसभेचा ठराव पाठविण्याबाबत, नेहरू वार्ड ते हनुमान मंदिर हायवे पर्यंत सलंगाचे पाणी नारी मध्ये काढण्याबाबत, चाळीसमोरील मच्छी मार्केट हटवून मेश्राम यांच्या घरासमोर नेण्याबाबत, सर्विस रोड वरील सर्व प्रकारचे अतिक्रमण हटविण्याबाबत, ताराबाई बारस्कर, बाळकृष्ण चाचरे, स्वाती अतकरी, यांना घरकुल लाभ देण्याबाबत, डॉक्टर नाकाडे ते फुलचंद बारस्कर पर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याबाबत, इस्तारी हजारे ते लोहरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करण्याबाबत, लहू बोरकर यांना गाडे मिळण्याबाबत, अशा अनेक विषयावर ग्रामसभेत ठराव सर्वानुमते घेण्यात आले. सदर ठरावाची अंमलबजावणी होते किंवा नाही याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

0 Response to "पहेला येथील ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा सभा ठरली वादळी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article