-->
पालांदूर येथे युवा शेतकरी कार्यशाळा उत्साहात‌.

पालांदूर येथे युवा शेतकरी कार्यशाळा उत्साहात‌.



नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 लाखनी :- तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालय पालांदूर तर्फे ग्रामपंचायत सभागृह पालांदूर येथे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ला भंडारा युवा शेतकरी मंच अंतर्गत युवा शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेला प्रमुख उपस्थित लताताई कापसे सरपंच पालांदूर, जिल्हा परिषद सदस्य सरिताताई कापसे, पंचायत समिती सदस्य योगिताताई झलके उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून किशोर पात्रीकर उपविभागीय कृषी अधिकारी साकोली तसेच तालुका कृषी अधिकारी लाखनी नितीन राठोड उपस्थित होते.

 सदर कार्यशाळेत उपविभागीय कृषी अधिकारी साकोली किशोर पात्रीकर यांनी कृषी क्षेत्रातील विविध संधी व यशस्वी शेतकरी यांची यशोगाथा इत्यादी बाबीचे सविस्तर सादरीकरण केले. तसेच तालुका कृषी अधिकारी नितीन राठोड यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

 सदर कार्यशाळेत सहभागी झालेल्या युवा शेतकऱ्यांकडून त्यांचे कृषी क्षेत्रातील इच्छा व आवश्यकता असलेल्या बाबी बद्दल मनोगत घेण्यात आले. तसेच सर्वांकडून विविध इच्छुक बाबी करिता प्रतिसाद अर्ज भरून घेण्यात आले. सदर विविध इच्छुक बाबींची पडताळणी करण्यात येणार असून विविध बाबीनुसार जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहे याबाबत माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेत फळबाग लागवड, पशुपालन, कुक्कुटपालन,आधुनिक शेती, भाजीपाला लागवड,यांत्रिकी शेती, शेतीपूरक व्यवसाय इत्यादी बाबींसाठी प्रतिसाद प्राप्त झाले असून युवा शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 सदर वेळी प्रगतशील शेतकरी आशिष नंदनवार पालांदूर यांनी भाजीपाला पीक लागवड विषय मनोगत व्यक्त केले तसेच ते बोलले की, भाजीपाला पीक मनी बँक असून युवा शेतकऱ्यांनी पुढे येऊन भाजीपाला व फळपिकाकडे वळावे असे प्रतिपादन केले. तसेच मोरेश्वर सिंगनजुडे प्रगतशील शेतकरी कोलारी यांनी फळपीक लागवडीबाबत चे मनोगत व्यक्त केले. तसेच मुखरू बागडे पालांदूर यांनी युवा शेतकऱ्यांनी पुढे येऊन आधुनिक पद्धतीने शेती करावी व उद्योजक बनावे असे प्रतिपादन केले.

 सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक विकास झलके मंडळ कृषी अधिकारी पालांदूर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विभा शिवणकर व आभार स्मिता मोहरकर यांनी केले.
 सदर कार्यशाळेला श्रीकांत सपाटे उप कृषी अधिकारी साकोली, विद्या गीऱ्हेपुंजे उप कृषी अधिकारी पालांदूर, योगेश मोहतुरे उप कृषी अधिकारी पालांदूर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कहालकर मॅडम तसेच समस्त सहाय्यक कृषी अधिकारी निखिल रहांगडाले, योगेश गजभिये, विवेक गाढवे, सचिन झंजाड, संदीप धर्मशहारे, भाऊराव मांदाडे, अंकुर रामटेके, प्रज्ञा गोस्वामी आदी उपस्थित होते. पालांदूर मंडळ अंतर्गत 90 ते 100 युवा शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

0 Response to "पालांदूर येथे युवा शेतकरी कार्यशाळा उत्साहात‌."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article