ढिवरखेडा येथील तरुणाचा अर्जुनी/ मोरगाव तालुक्यात देऊळगाव /बोदरा येथे अपघाती निधन!
शुक्रवार, 27 फ़रवरी 2026
Comment
अर्जुनी मोर तालुक्यात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर
दुचाकी आमोरासमोर आढळल्या!.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- अर्जुनी /मोर तालुक्यातील देवळगाव/ बोद्रा जंगल परिसरात झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत व्यक्तीचे नाव मंगेश शिवणकर (वय अंदाजे ४०, रा. ढिवरखेडा, पालांदूर) तालुका लाखनी असे आहे. अपघात इतका भयानक होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींमध्ये दिगंबर जयदेव मडावी (वय ३०, रा. माहूरकुडा) व गजेंद्र मारोती मेष्राम (वय २७) यांचा समावेश आहे. दोघांनाही तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जंगल परिसरातील धोकादायक वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे ढिवरखेडा, पालांदूर व परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
0 Response to "ढिवरखेडा येथील तरुणाचा अर्जुनी/ मोरगाव तालुक्यात देऊळगाव /बोदरा येथे अपघाती निधन! "
एक टिप्पणी भेजें