लाखांदूर तहसील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मूलनिवासी संघाचे कलेक्टरांना निवेदन – तहसीलदारांमार्फत सादर.
गुरुवार, 5 फ़रवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रशासनिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर मूलनिवासी संघ, भारत शाखा – भंडारा यांच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तहसील कार्यालयाचे नवीन इमारत बांधकाम पूर्ण होऊनही अद्याप उद्घाटन व नियमित कामकाज सुरू न झाल्याने तालुक्यातील सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच अनुषंगाने मूलनिवासी संघाचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ शेन्डे यांच्या मार्फत, मूलनिवासी संघ महाराष्ट्र राज्याचे संघटन सचिव दिपक एन. मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी, भंडारा यांना सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये लाखांदूर तहसील कार्यालयाचे तात्काळ उद्घाटन करून नियमित प्रशासनिक कामकाज सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांना प्रमाणपत्रे, महसूल व जमिनीशी संबंधित कामांसाठी दूरवर जावे लागत असून त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करताना मूलनिवासी सभ्यता संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजकुमार सुखदेवे,
मूलनिवासी विद्यार्थी संघाचे तालुकाध्यक्ष प्रणय बावणथरे,
पिपल्स युथ फ्रंटचे जिल्हाध्यक्ष निशिकांत मेश्राम,
आदिवासी हलबी समाज संघटना पारडीचे पदाधिकारी रूपचंद नाईक,
बी.एस.पी.चे तालुकाध्यक्ष चेतन बोरकर,
तसेच पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे तालुकाध्यक्ष कैलास सूर्यवंशी
यांची उपस्थिती होती.
या निवेदनाद्वारे प्रशासनाने जनहिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
0 Response to "लाखांदूर तहसील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मूलनिवासी संघाचे कलेक्टरांना निवेदन – तहसीलदारांमार्फत सादर."
एक टिप्पणी भेजें