-->
भंडाऱ्यात नवजात बालिकेच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त.

भंडाऱ्यात नवजात बालिकेच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त.

सप्ताहिक जनता की आवाज" 
 न्यूज नेटवर्क.

तुमसर :- जिल्ह्यात नवजात बालिकेची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचा पर्दाफाश झाला असून याप्रकरणी एका महिला दलालाला अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार असलेला गोंदिया येथील डॉक्टर व त्याचे सहकारी फरार असून पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ
उडाली आहे.
या रॅकेटचा उलगडा महिला व बालविकास विभागांतर्गत असलेल्या चाइल्ड हेल्पलाइन १०९८च्या सतर्कतेमुळे झाला. पांढराबोडी (भंडारा) येथील मालती प्रकाश

डॉक्टर फरार, एक महिला अटकेत

वाघमारे हिच्या घरी दहा दिवसांची नवजात बालिका असल्याची माहिती समन्वयक लोकप्रिया देशभ्रतार यांना मिळाली. चौकशीत मालती हिने ही बालिका गोंदियावरून आणल्याचे सांगितले. मात्र बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावूनही ती गैरहजर राहिली. संशय बळाविल्याने वरठी पोलिसांनी मालती वाघमारे हिच्या घरी धाव घेतली.

तेव्हा ती बालिकेला घेऊन पसार झाल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ मोहाडी हद्दीतील कुशारी फाटा येथे नाकाबंदी करून वाहन अडविले. यावेळी पौर्णिमा सतीश धुर्वे हिच्या ताब्यात ती बालिका आढळली. पौर्णिमा हिने गोंदिया येथील डॉक्टरच्या सांगण्यावरून बालिकेला नेत असल्याचे कबूल केले. बालिकेच्या पालकांनी बालकल्याण

समितीसमोर हजर होऊन आपली कैफियत मांडली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने गोंदिया येथील डॉक्टरने नागपूरला मोफत उपचारासाठी पाठवितो, असे सांगून त्यांची फसवणूक केली होती. प्रत्यक्षात तपासात असे आढळले की, डॉक्टरची हस्तक ललेश्वरी नंदकिशोर सादेपाच हिच्या बँक खात्यात मालती वाघमारे हिने मोठी रक्कम चेकद्वारे जमा केली होती. यावरून हा बालिकेच्या विक्रीचा व्यवहार असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पोलिसांनी ललेश्वरी सादेपाच हिला अटक केली. उमेशसिंग रामचंद्रसिंग गहलोत व इतर आरोपींवर वरठी पोलीस ठाण्यात बालन्याय कायदा आणि भान्यासंच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी (साकोली) शिवम विसापुरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून फरार डॉक्टरच्या अटकेनंतर या रॅकेटचे आंतरराज्य धागेदोरे समोर येण्याची.

0 Response to "भंडाऱ्यात नवजात बालिकेच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article