राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा.
शनिवार, 21 फ़रवरी 2026
Comment
विजय चौंडेकर
"साप्ताहिक जनता आवाज"
नांदेड :- आज दि.२१ फेब्रुवारी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष (मंत्री दर्जा) पाशा पटेल हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. रविवार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७वा. लोदगा, लातूर येथून नांदेडकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आगमन. सकाळी ११.०५ वा. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे माधवराव पाटील यांच्या गौरव सोहळा कार्यक्रमास उपस्थित. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण राखीव.
0 Response to "राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा दौरा."
एक टिप्पणी भेजें