मिरची, भेंडीचे दर कडाडले.पुढील दोन महिने भाव कायम राहण्याची शक्यता.
शनिवार, 21 फ़रवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- बाजारात मिरची दररोज तिखट होत आहे, तर भेंडी भाव खात आहे. कालपर्यंत मिरची ८० रुपये, तर भेंडी ४५ रुपये प्रतिकिलो दराने ठोक भावात बीटीबी येथे विकली. जिल्ह्यातील आठवडी बाजारात मिरचीला शंभर रुपये, तर भेंडीला ६० रुपये किलोचा दर मिळाला. हा दर पुढचे दोन महिने अर्थात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता बीटीबी अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी वर्तवले आहे.
बऱ्याच वर्षानंतर गत नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्या पावसाने खरीप हंगाम अक्षरशः संकटात आला. धान उत्पादकांचा चुराडा झाला, तर भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका बसला. त्याचा परिणाम बाजारपेठेवर फेब्रुवारी महिन्यापर्यंत दिसला आहे.
आधी खूप पाऊस व त्यानंतर पडलेल्या थंडीने मिरचीचे बाग संकटात आले. भेंडीचे सुद्धा तेच झाले. त्यामुळे बाजारपेठेत अपेक्षित असलेले मिरची व भेंडीचे उत्पन्न अत्यल्प ठरले. त्यातूनच दरवाढ होत शेतकऱ्यांना आधार मिळाला. आतापर्यंत थंडी
पालांदूर: शेतातील भेंडी विक्रीसाठी बाजारात पाठविताना अरुण पडोळे.
असल्याने बागायतीवर संकट वाढले होते. दुपारी ऊन, रात्री थंडी व सकाळी धुके असल्याने बागेची वाढ थांबली. परिणामी मिरची व भेंडीच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम जाणवला. इतर राज्यातही मिरची तेजीत
आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू व उत्तर प्रदेशात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात त्या तुलनेत मिरचीचे उत्पादन कमी ठरते. बदलत्या वातावरणामुळे मिरची उत्पादक राज्यात सुद्धा मिरचीचे उत्पादन अर्धवट ठरल्याने लाल मिरचीचे दर सुद्धा ३०० रुपये किलोच्या घरात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
मिरची बागेला बारीक पाखरे व
कमी ठरते. बदलत्या वातावरणामुळे मिरची उत्पादक राज्यात सुद्धा मिरचीचे उत्पादन अर्धवट ठरल्याने लाल मिरचीचे दर सुद्धा ३०० रुपये किलोच्या घरात असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
शेतकऱ्यांनी उत्पादनाची जागा अदलाबदल करावी. एकाच ठिकाणी एकच पीक वारंवार लावू नये. नुसती रासायनिक शेती सुद्धा करू नये. स्वतःचा अनुभव व कृषी विभागाचा सल्ला पाठीशी ठेवून ड्रिप व मल्चिंगवर बागायती केल्यास नगदी उत्पन्नात वाढ शक्य आहे.
बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी भंडारा.
मिरची बागेला बारीक पाखरे व
धुक्यांचा मोठा फटका बसला आहे. दर हप्त्याला बागेत कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. कृषी विभागाने मिरची उत्पादकांना सहकार्य करण्याची नितांत गरज आहे.
0 Response to "मिरची, भेंडीचे दर कडाडले.पुढील दोन महिने भाव कायम राहण्याची शक्यता."
एक टिप्पणी भेजें