बार्टी व एम सी ई डी यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.
रविवार, 22 फ़रवरी 2026
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध एक महिना व दोन महिने कालावधीचे अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा की अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा या तांत्रिक माहितीच्या आधारे रोजगार मिळवावा.
सदर प्रशिक्षणात संबंधित विषयाचे प्रॅक्टिकल सह तांत्रिक ज्ञान तसेच उद्योजकीय ज्ञान जसे उद्योग उभारणी कशी करावी, शासकीय कर्जविषयक /अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा लायसन याविषयीची माहिती इत्यादी बाबींविषयी तज्ञ मार्गदर्शकाद्वारे प्रशिक्षण दिल्या जाईल,
सदर प्रशिक्षणासाठी लाभार्थीची निवड प्रत्यक्ष मुलाखती द्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी लाभार्थी हा 18 ते 45 वयोगटातील असावा, तो अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, कॉम्प्युटर डी.टी.पी आणि ड्रोन ऑपरेशन अँड मेंटेनेस या करिता किमान १० वी पास, ऍनिमेशन अँड ग्राफिक्स या करिता पदवीधर ( Engineering, Polytechnic, MCA, BCA, MSC,BSC यांना प्राधान्य ) शिक्षण घेतलेले असावे, तो गेल्या पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार / रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.
सदर प्रशिक्षणासाठी उद्योजकता परिचय कार्यक्रम व मुलाखत कॉम्प्युटर डी.टी.पी करिता दि. 26/02/2026 रोजी D-Tech कॉम्प्युटर, बसडेपो जवळ, बदलापूर (प), ऍनिमेशन अँड ग्राफिक्स व ड्रोन ऑपरेशन अँड मेंटेनेस करिता दि.28/02/2026 रोजी अचिवर्स कॉलेज मल्हारनगर, जोशीबाग,कल्याण (प ). येथे सकाळी 11.00 वाजता आयोजीत करण्यात आलेली आहे.
तरी इच्छुक व्यक्तींनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, ठाणे . येथे संपर्क डॉ. संध्या येवले. मोबाईल क्रमांक 7020616492, श्री. सुबोध बायस मोबाइल क्रमांक 7774053014 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. दत्तात्रेय थावरे विभागीय अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोकण भवन, मुंबई यांनी केले आहे.
0 Response to "बार्टी व एम सी ई डी यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें