"पाणीपट्टी वाढ म्हणजे उल्हासनगर शहरातील जनतेचा पाठीत खंजीर आणि विश्वासघात"; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नवनिर्वाचित नगरसेवक आणि पालिकेवर निशाणा.
रविवार, 22 फ़रवरी 2026
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :-- उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा आणि अनियमित वेळापत्रक या गंभीर समस्या कायम असतानाच महापालिका प्रशासन आणि नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेशी घोर विश्वासघात केला आहे. पहिल्याच महासभेत पाणीपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे उल्हासनगर शहरातील करदात्या नागरिकांवर अन्याय झाला असून संतापाची लाट पसरली आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने पाणीपट्टीत सरासरी २० ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला असून त्याला नवनिर्वाचित नगरसेवकांनी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार विविध गटांसाठीच्या पाणीपट्टीत लक्षणीय वाढ झाली आहे. पूर्वी ३६०० रुपये असलेला दर आता ४४०० रुपये (वाढ ८०० रुपये), पूर्वी १८०० रुपये असलेला दर आता २४०० रुपये (वाढ ६०० रुपये) , पूर्वी १२०० रुपये असलेला दर आता १५०० रुपये (वाढ ३०० रुपये) करण्यात आला आहे.
याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी राज प्रकाश महाडिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "उल्हासनगरमधील नागरिक अनेक वर्षांपासून पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याच्या समस्येने त्रस्त आहेत. सांडपाणी मिसळलेले दूषित पाणी पिण्यास भाग पाडले जात आहे. पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत, सेवा देण्याऐवजी थेट पाणीपट्टी वाढवणे म्हणजे जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे."
राज महाडिक पुढे म्हणाले, "गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्तांनी पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आणला होता, तेव्हा आज सत्तेवर असलेल्या याच नगरसेवकांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. तेव्हा ते उल्हासनगरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी हिरो बनण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सत्तेवर बसताच पहिल्याच महासभेत जनतेच्या हिताचा विसर पाडून त्यांनी पाणीपट्टी वाढीला मान्यता दिली. भरघोस मतांनी निवडून दिलेल्या या लोकप्रतिनिधींनी मतदारांना ही 'सप्रेम भेट' दिली आहे.
नागरिकांनी मोठ्या आशेने आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी या नवनिर्वाचित प्रतिनिधींना निवडून दिले होते. मात्र, पहिलाच निर्णय जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
राज प्रकाश महाडिक यांनी या अन्यायकारक निर्णयाला वाहत्या पाण्यात विरोध करण्याचा इशारा देताना म्हटले की, "जनतेच्या मतांवर अधिकार गाजवणाऱ्या या जनप्रतिनिधींनी आपली चूक लवकरात लवकर ओळखून हा निर्णय रद्द करावा, अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उल्हासनगरमध्ये आंदोलन छेडण्यात येईल."
0 Response to ""पाणीपट्टी वाढ म्हणजे उल्हासनगर शहरातील जनतेचा पाठीत खंजीर आणि विश्वासघात"; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नवनिर्वाचित नगरसेवक आणि पालिकेवर निशाणा."
एक टिप्पणी भेजें