तिरोडा शहरातील तब्बल ७० सीसीटीव्ही बंद.
सोमवार, 9 फ़रवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
तिरोडा :- शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्चुन बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा आज शोभेची वस्तू ठरत आहे. तिरोडा नगर परिषद हद्दीत बसविण्यात आलेल्या १०७ पैकी तब्बल ७० कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचे उघड झाले असून, त्यामुळे शहराची सुरक्षा व्यवस्थाच कोलमडली आहे.
शहरात घरफोडी, दुचाकी चोरी, अवैध धंदे, मारहाणीच्या घटना वाढत असताना सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी उभारलेली यंत्रणा निष्क्रिय राहिल्याने पोलिस तपासातही मोठा फटका बसत आहे. परिणामी, गुन्हेगारांना शहरात मोकळे रान मिळाले आहे.
नगर परिषद प्रशासनाला कॅमेरे बंद असल्याची माहिती असूनही महिनोन्महिने त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली सुरक्षा यंत्रणा देखभालीअभावी निकामी होणे म्हणजे करदात्यांच्या पैशांची उघड उधळपट्टी असल्याची तीव्र भावना शहरात व्यक्त होत आहे. शहरात यापूर्वी हाणामारी, चोरी, अवैध व्यवसायांच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत
नगर परिषदेच्या निष्काळजीपणा; गुन्हेगारांना मोकळे रान
असणे गरजेचे असताना तब्बल ७० कॅमेरे बंद असणे ही नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरली आहे.
नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी याकडे तातडीने लक्ष देऊन बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करतील का? असा सवाल उपस्थित होत आहे. शहर सुरक्षित ठेवणे ही नगर परिषदेची जबाबदारी आहे की, केवळ निवडणुकीपुरता गाजावाजा? असाही प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
तिरोडा शहर आज प्रत्यक्षात 'सीसीटीव्ही विना शहर' बनत चालले असून, प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास गुन्हेगारी घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
0 Response to "तिरोडा शहरातील तब्बल ७० सीसीटीव्ही बंद."
एक टिप्पणी भेजें