रेशीम उद्योगासाठी इच्छुक शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरू.
सोमवार, 9 फ़रवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
नागपूर :- शेतीचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे हमखास व शाश्वत उत्पन्न याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी प्रचार व प्रसिद्धी करणे तसेच रेशीम उद्योग करण्यास इच्छुक लाभार्थ्यांची नावनोंदणी करणे या उद्देशाने जिल्ह्यात ५ मार्चपर्यंत महा-रेशीम अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत रेशीम शेती म्हणजे काय, तिचे महत्त्व, बाजारपेठेची उपलब्धता, रेशीम उद्योगासाठी उपलब्ध योजनांची माहिती देणार असून रेशीम उद्योगासाठी इच्छुक लाभार्थ्यांची नावनोंदणी करण्यात येत आहे. रेशीम उद्योगात सहभागी होण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी नावनोंदणीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, उमरेड रोड, निर्मल नगरी जवळ, नागपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्निल तायडे यांनी केले.
0 Response to "रेशीम उद्योगासाठी इच्छुक शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरू."
एक टिप्पणी भेजें