-->
निमगाव येथे वर्धापन दिन व रमाई जयंतीनिमित्त बुद्ध - भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजन.

निमगाव येथे वर्धापन दिन व रमाई जयंतीनिमित्त बुद्ध - भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजन.



कुलदीप गधें
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- निमगाव पो. पहेला, ता. जि. भंडारा येथे शुद्धोधन बहुउद्देशीय संस्था, निमगाव यांच्या वतीने सिद्धार्थ महाबोधी महाविहाराचा ४० वा, समता सैनिक दल शाखा निमगावचा २० वा वर्धापन दिन तसेच रमाई जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हा कार्यक्रम रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सिद्धार्थ महाबोधी महाविहार, निमगाव येथे पार पडणार असून रात्री ९.०० वाजता भव्य बुद्ध–भीम गीतांचा बहारदार संगीत कार्यक्रमाचे शुध्दा आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात मनोजराजा गोसावी (यवतमाळ) — फुले, शाहू, आंबेडकर चळवळीचे भीमशाहीर व राष्ट्रीय प्रबोधनकार तसेच 
महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका व प्रबोधनकार अंजली घोळके (लातूर) सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून समता, बंधुता, मानवता व संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात येणार आहे. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

0 Response to "निमगाव येथे वर्धापन दिन व रमाई जयंतीनिमित्त बुद्ध - भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article