-->
लघु व मध्यम वृत्तपत्रांचा आवाज उठविणारे आज २१ फेब्रुवारीला वरोरा येथे अधिवेशन.

लघु व मध्यम वृत्तपत्रांचा आवाज उठविणारे आज २१ फेब्रुवारीला वरोरा येथे अधिवेशन.



  विजय चौडेकर
 "साप्ताहिक जनता की आवाज"
 
 नांदेड :- आज दि.२१ फेब्रुवारी लघु व मध्यम वृत्तपत्रांसमोरील प्रश्न, आव्हाने आणि आधुनिक माध्यमातील संधी यावर सखोल चर्चा करण्यासाठी स्मॉल अँड मिडीयम न्यूजपेपर असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय पत्रकारांचे एकदिवसीय खुले अधिवेशन आज शनिवारी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी वरोरा येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पत्रकार, संपादक, प्रकाशक, मुद्रक, वार्ताहर तसेच डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची
माहिती आयोजकांनी दिली आहे.

अधिवेशनाचे उद्घाटन आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार संजयजी देरकर, राजुरा चे आमदार देवरावदादा भोंगळे आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर उपस्थित राहतील. स्मॉल ड मेडीयम न्यूज पेपर्स असोसिएशनचे वतीने देण्यात येणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार नांदेड येथील पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना आज शनिवारी २१ तारखेला चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा ईथे आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या अधिवेशनात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

0 Response to "लघु व मध्यम वृत्तपत्रांचा आवाज उठविणारे आज २१ फेब्रुवारीला वरोरा येथे अधिवेशन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article