शिक्षणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर द्या.
सोमवार, 2 फ़रवरी 2026
Comment
• जि.प. सदस्य प्रियंक बोरकर यांचे प्रतिपादन.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- "आपल्या मुलांना घडवितांना जाती धर्माचा विचार न करता वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर देणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यांना आणि मुलांना शिक्षणातून कसे घडविता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन भंडारा जीप सदस्य प्रियंक बोरकर यांनी केले. लाखांदूर तालुक्यातील विरली/बू येथील सनलूक इंग्लिश कॉन्व्हेन्ट मध्ये 26 जानेवारी रोजी गणतंत्र दिनाचे औचित्य साधून आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, सनलूक स्कूल च्या माध्यमातून मुले उत्कृष्ट घडतील अशी आशाही त्यांनी व्यक्त करीत शाळेचे कार्य आणि सुरू असली शैक्षणिक वाटचाल याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. तसेच, एका छोट्याश्या कथेच्या माध्यमातून लाखांदूर चे गटशिक्षणाधिकारी b.u.वरावटे यांनी उपस्थित पालक वर्गांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
या स्नेहसंमेलनादरम्यान चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली तर या कॉन्व्हेन्ट मधील चिमुकल्यांच्या प्रजासत्ताक दिनावर आधारित इंग्लिश मधून दिलेल्या भाषणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले. यात विशेष सांगायचं म्हणजे अगदी 3 ते 6 वयोगटातील चिमुकल्या विदर्थ्यांनी मंचावर येवून इंग्लिश मधून दिलेले भाषण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लाखांदूर चे गटशिक्षणाधिकारी बी.यू. वरवटे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला सहऊद्घटक म्हणून भंडारा जीप सदस्य रसिका रंगारी, अध्यक्ष म्हणून भंडारा जीप सदस्य प्रियंक बोरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर, bsss चे अध्यक्ष मनोज बन्सोड, विरली/बू च्या सरपंच गोदावरी महावाडे, माजी उपसरपंच मिलिंद सिंव्हगडे, विरली/खुर्द च्या सरपंच शारदा पारधी, पाहुनगावचे सरपंच संदीप कोरे, डोकेसरांडी चे सरपंच सुधीर मिसार, धामणी च्या सरपंच संगीता हुमने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सनलुक इंग्लिश कॉन्व्हेन्ट च्या मुख्याध्यापीका योगिता महावाडे यांनी सांगितले. संचालन शिक्षिका प्रियंका चुटे यांनी केले तर आभार वंदना ढोरे यांनी मानले.
*पालकांच्या मेहनतीला शाळेचा सलाम*
आपली मुलेही शर्यतीत राहावं, या उद्देशातून स्वतः मोलमजुरी करून हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या पाल्यांना शिकविणाऱ्या काही पालकांचा स्नेहसंमेलनादरम्यान शाळेतर्फे त्याचा मृतीचीन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
*संचालनातून जिंकली उपस्थितांची मने*
कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका प्रियंका चुटे यांनी केले. मात्र, संचालणादरम्यान त्यांनी सादर केलेली स्लोगन, शायरी आणि त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थित पाहुण्यांसह उपस्थित सर्वांची मने जिंकली. विशेष म्हणजे, आयोजित कार्यक्रम, चुकिकल्यांचे सादरीकरण आणि या कार्यक्रमाचे संचालन या सर्वांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.
0 Response to "शिक्षणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर द्या."
एक टिप्पणी भेजें