राष्ट्रचेतना अभियानाद्वारे डॉ. आंबेडकर यांच्या राष्ट्रनिर्मितीचा उलगडा.
रविवार, 8 फ़रवरी 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रचेतना प्रेरणा अभियानांतर्गत ७फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह लाखनी येथे एका विशेष वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील सशक्त आणि समताधिष्ठित भारताची निर्मिती व्हावी, या उद्देशाने दोन तासांचे प्रभावी पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन सादर करण्यात आले.
प्रख्यात आंबेडकरवादी विचारवंत रंजित गणवीर यांनी याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
त्यांनी आपल्या सखोल मांडणीतून सामाजिक समता, संविधानिक मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नागरिकांची जबाबदारीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला केशव रामटेके, सचिन रामटेके, अंकित बडोले, विशाल जांभूळकर, वैभव नंदेश्वर, मोहित शहारे आणि धारगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रचेतना जागृतीसाठी अशा उपक्रमांवर भर दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन खोब्रागडे यांनी केले. आभार प्रा. विजय रंगारी यांनी मानले. रमाई आंबेडकरांच्या त्याग आणि संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
0 Response to "राष्ट्रचेतना अभियानाद्वारे डॉ. आंबेडकर यांच्या राष्ट्रनिर्मितीचा उलगडा."
एक टिप्पणी भेजें