(कविता)
शनिवार, 14 फ़रवरी 2026
Comment
संकलन/संग्रहक
हर्षवर्धन देशभ्रतार
(भीमाई पोटी आला भुवर)
(चाल:- काटा चुपा पाव मे)
पाळणा पाळणा हलविते
भीवा बाळाला,मी, हलविते ।। धृ.।।
भीमाई पोटी आला भुवर
रामजीचा बाळ भीवा कुंवर
गावांत आनंद फुलविते ।।१।।
मिरा आत्त्याने बांधली दोरी
हलवी भीवाला गाऊन लोरी
मिराबाई अंगाई गाईते ।।२।।
चौदावे रत्न जन्मास आले
महुगाव हे आनंदी झाले
भीवा हा हासून भुलविते ।।३।।
जो जो येतो करितो लाड
गोरा गोरा भीवा तो बाळ
सुभेदार गौतम लाड पुरविते ।।४।।
कवी पञकार गौतम धोटे
आवारपर
0 Response to "(कविता)"
एक टिप्पणी भेजें