नादुरुस्त वाहने सर्व्हिस रोडवरच राहतात उभी.
बुधवार, 18 फ़रवरी 2026
Comment
• रस्ता मोकळा करण्याची नगरपालिकेकडे मागणी.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी
साकोली :- रस्त्यांचे जाळे जितके विस्तारते, तितकीच वाहतूक व्यवस्था सुलभ होणे अपेक्षित असते. मात्र साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद हद्दीत याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे. साकोली येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडवर गेल्या काही महिन्यांपासून नादुरुस्त चारचाकी वाहने उभी करून त्यांची दुरुस्ती केली जात आहे. गॅरेज व्यावसायिकांच्या या अतिक्रमणामुळे हा रस्ता अपघातांना निमंत्रण देणारा ठरत असून, तो नागरिकांच्या जिवावर उठला आहे.
कापगते पेट्रोल पंप, एमबी. पटेल कॉलेजसमोर आणि निपाणे कॉलनीजवळील सर्व्हिस रोड सध्या दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांनी व्यापलेला असतो. ही वाहने दुरुस्त करताना अचानक उघडले जाणारे दरवाजे दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. तसेच, दुरुस्तीदरम्यान निघणारा काळा धूर आणि रसायनांमुळे पादचाऱ्यांना श्वसनाचे व डोळ्यांचे विकार जडत आहेत. या मार्गावरून नवजीवन हायस्कूल, वैनगंगा शैक्षणिक संकुल, करंजेकर फार्मसी महाविद्यालय अशा विविध संस्थांमधील हजारो विद्यार्थी रोज ये-जा करतात. या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर धुरामुळे विपरीत परिणाम होत असल्याची भीती
पालकांकडून व्यक्त केली जात आहे. साकोली हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने बस स्थानक, पेट्रोल पंप आणि
नगरसेवकांचा कठोर कारवाईचा इशारा
सर्व्हिस रोडवर वाहनांची दुरुस्ती करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या संदर्भात प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक पुष्कर ग्यानिवंत करंजेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही यापूर्वीच नगरपरिषदेच्या वतीने संबंधितांना जागा मोकळी करण्यासाठी लेखी सूचना दिल्या होत्या. तरीही परिस्थिती सुधारली नसल्याने, आता पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. दुरुस्तीसाठी लावलेल्या मोठ्या वाहनांमुळे रस्ता कमालीचा अरुंद झाला असून, साध्या पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे. नगरपरिषद प्रशासन आणि पोलिस वाहतूक विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व्हिस रोडवरील ही अनधिकृत वाहने तातडीने हटवावित, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
0 Response to "नादुरुस्त वाहने सर्व्हिस रोडवरच राहतात उभी."
एक टिप्पणी भेजें