-->
नेहरू नगर भोजापूर येथे माता रमाई जयंती साजरी

नेहरू नगर भोजापूर येथे माता रमाई जयंती साजरी


  संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भोजापूर  : दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकायत बहुउद्देशीय संस्था भोजापूर यांच्या वतीने नेहरू नगर भोजापूर येथे त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश मेश्राम यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक बौद्ध वंदना ग्रहण करून माता रमाई यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

        यावेळी वक्त्यांनी “रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावली असून त्याग, समर्पण व संघर्ष यांचा समानार्थी शब्द म्हणजे रमाबाई” असे विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार असले, तरी त्यांच्या जीवनाच्या घडणीत रमाबाईंचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी कवितांचेही सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष योगेश मेश्राम, संस्था सचिव नरेंद्र गणविर, प्रा. डॉ. विजय गणविर, प्रा. डॉ. महेशकुमार भैसारे, संस्था कोषाध्यक्ष ऋषी गोस्वामी, सुरेंद्र मेश्राम, देवेंद्र धारगावे, दिपाली भोरे, वर्षा गणविर, राहुल रामटेके, मंजिरी भोरे, अंश बोरकर, रत्नघोष भालाधरे, इंदिरा भालाधरे यांच्यासह नेहरू नगर व अंबिका नगर भोजापूर येथील महिला, पुरुष तसेच लहान बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राहुल भोरे यांनी केले.

0 Response to "नेहरू नगर भोजापूर येथे माता रमाई जयंती साजरी"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article