संघ-भाजप सत्तेविरोधात बहुजन समाज लढ्यासाठी सज्ज.
शनिवार, 21 फ़रवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
यवतमाळ :- भारतीय संविधान व लोकशाही संपवण्याचा कट रचणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघझभाजप सत्तेविरोधात बहुजन समाज आता निर्णायक लढ्यासाठी सज्ज झाला आहे. बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी षड्यंत्रपूर्वक रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर देशभरातून लाखोंच्या सहभागाने महाविशाल
महारॅली काढण्यात येणार असल्याची आक्रमक घोषणा आज यवतमाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
शासकीय विश्राम गृह, यवतमाळ येथे आयोजित या पत्रकार परिषदेत बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. हृसंविधानिक चळवळी दडपण्याचा हा थेट प्रयत्न असून, लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचे काम सुरू आहे. हे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा
देण्यात आला. अधिवेशन रद्द करणे म्हणजे मौलिक अधिकाराचे हनन करणे होय, ओबीसी जातनिहाय जनगणना, सामाजिक न्याय व राजकीय हक्कांबाबत देशव्यापी जनजागृती होऊ नये म्हणूनच राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. हा निर्णय म्हणजे संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य व संघटन स्वातंत्र्यावर घाला आहे असे वक्तव्य करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला.
पत्रकार परिषदेत २२ फेब्रुवारीच्या नागपूर महारॅलीची भूमिका, तयारी व देशभरातील आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली. हा लढा कोणत्याही एका संघटनेचा नाही हा देशाच्या भविष्याचा लढा आहे असे ठणकावून सांगण्यात आले. वकील, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, विद्यार्थी, युवक, सामाजिक व राजकीय संघटनांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे खुले आवाहन करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातून हजारों कार्यकर्ते नागपूरकडे कूच करणार असल्याची माहितीही देण्यात आली.
0 Response to "संघ-भाजप सत्तेविरोधात बहुजन समाज लढ्यासाठी सज्ज."
एक टिप्पणी भेजें