तरुण-तरुणी शिक्षित अनशिक्षित बांधवांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.- गजानन पाटील चव्हाण.
गुरुवार, 12 मार्च 2026
Comment
विजय चौडेकर
साप्ता."जनता की आवाज"
नांदेड :- 12 मार्च 2016 रोजी सकाळी दहा वाजता सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी चे संस्थापक चेअरमन कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्था व जनसेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांच्या संयुक्त च्या वतीने दि. 12 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता, सगरोळी येथे भव्य रोजगार मेळावा-उद्यमिता 2026 चे आयोजन करण्यात येत आहे.
या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार असून ग्रामीण भागातील 10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा व पदवीधर युवक-युवतींना थेट मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जाग्यावरच जॉइनिंग ऑफर लेटर दिल्या जाणार आहेत.
नोंदणी व सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून, इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या Link वर क्लिक करून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
ग्रामीण युवक-युवतींसाठी शिक्षित आणि शिक्षित यांना ही एक सुवर्णसंधी असून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या या सामाजिक व सामाजिक व्यवस्थेमधील असलेल्या सर्व बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा सर्व बांधवांच्या आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन पाटील चव्हाण सह दोन्हीही संयुक्त संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Response to "तरुण-तरुणी शिक्षित अनशिक्षित बांधवांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.- गजानन पाटील चव्हाण."
एक टिप्पणी भेजें