-->
न.प. नामनिर्देशित सदस्य निवडीला 'कायदेशीर' ब्रेक.

न.प. नामनिर्देशित सदस्य निवडीला 'कायदेशीर' ब्रेक.



साप्ता."जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा/तुमसर :- तुमसर नगर परिषदेतील नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीवर अखेर कायदेशीर ब्रेक लागला.

 असून दि. १२ मार्च रोजी होणारी विशेष सभा तहकूब करण्यात आली. नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही सभा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नगर विकास विभागाच्या आदेशांबाबत आणि कायदेतज्ज्ञांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामध्ये निर्माण झालेल्या कायदेशीर पेचामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. एका बाजूला शासन स्तरावरील प्रशासकीय निर्देश, तर दुसऱ्या बाजूला कायदेशीर सल्ल्यामध्ये असलेली विसंगती यामुळे निवड प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट आले होते. दरम्यान,

या प्रकरणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका क्रमांक २७८७/२०२६ व २७८८/२०२६ दाखल आहेत. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रक्रियेबाबत काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली होती. मात्र, न्यायालयाचा अधिकृत लेखी आदेश अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेला नसल्याने, त्या आदेशाची प्रतीक्षा करणेच योग्य ठरेल, अशी भूमिका नगराध्यक्षांनी घेतली. नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले की, न्यायालयाचा लेखी आदेश प्राप्त होण्यापूर्वी निवड प्रक्रिया राबविणे म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेचा मान राखण्यासाठी विशेष सभा तहकूब करण्याची विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सावध भूमिका घेत सभा पुढे ढकलल्याचे समजते. विशेष सभेच्या तहकुबीमुळे

संविधानाचा आदर आणि न्यायालयाचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आहे. तांत्रिक त्रुटी असताना प्रक्रिया राबविणे योग्य ठरणार नाही. पारदर्शक आणि पूर्णतः कायदेशीर मार्गानेच नामनिर्देशित सदस्यांची निवड व्हावी, ही आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळेच विशेष सभा तहकूब करण्याची मागणी केली होती.

                      इंजि. सागर गभने
                          नगराध्यक्ष
                    नगर परिषद, तुमसर.

नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीचा प्रश्न पुन्हा अनिश्चिततेत गेला आहे. न्यायालयाचा स्पष्ट आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया ठरवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे तुमसर नगर परिषदेतील राजकीय वातावरण, चांगलेच तापले असून, न्यायालयाचा पुढील आदेश काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Response to "न.प. नामनिर्देशित सदस्य निवडीला 'कायदेशीर' ब्रेक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article