-->
सोनेगावात महानुभाव पंथाच्या भव्य पदयात्राचे जल्लोषात स्वागत

सोनेगावात महानुभाव पंथाच्या भव्य पदयात्राचे जल्लोषात स्वागत


       दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा /नागपूर :- कळमेश्वर तालुक्यातील सोनेगाव येथे श्री परमश्रेय महानुभाव आश्रमाच्या वतीने आयोजित पदयात्रेचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. भाविकांच्या जयघोषात पदयात्रेचे सोनेगाव नगरीत आगमन झाले.

 'पायी तीर्थ यात्रा घडो, देह देवा द्वारी पडो' या ब्रीदवाक्याने ४ मार्च रोजी श्रीक्षेत्र मनसर (ता. रामटेक) येथून सुरू झालेली ही पदयात्रा सोनेगाव येथील श्री दत्त मंदिरात पोहोचली. यावेळी महंत बांधकरबाबा, महंत मायेराजबाबा कारंजेकर (श्रीक्षेत्र मनसर), महंत सांगविकरबाबा (पिपळा), महंत शिवणेकरबाबा (दहेगाव) तसेच व्याकरणाचार्य राजशास्त्री बांधकर प्रमुख उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान दररोज पूजा, महाआरती, प्रवचन, भजन-कीर्तन आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली. महानुभाव पंथाचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने परमश्रेय महानुभाव

आश्रमाच्या वतीने दरवर्षी या पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. या पदयात्रेत डॉक्टर, शेतकरी, व्यापारी, व्यावसायिकांसह महिला भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कार्यक्रमात हंसराज ढोके, बाळू बोरकर, रौनक बोरकर, करण बोरकर, दत्तराज खांडेकर, अमोल बोरकर, युवराज खांडेकर, राहुल खांडेकर, तेजराज बोरकर, जिद्धार्थ बोरकर, राजू गजभिये, अण्णा निमकर, विलास लेंगे, अजय धनवटे, अंबर ठाकरे, रामचंद पुनटकर, विलास टोंगे, सुनिल टोंगे,

सुरेश बोरकर आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी कन्हैया गजभिये, भीमराव सोमकुवर व महानुभाव पंथातील मंडळींचे विशेष सहकार्य लाभले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर अरोरांचा फोटो शेअर करत, दादांच्या विमान अपघातानंतर हे महाशय सध्या कुठे आहेत? महाराष्ट्राचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतेय का ? असा सवाल उपस्थित केला. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले.

0 Response to "सोनेगावात महानुभाव पंथाच्या भव्य पदयात्राचे जल्लोषात स्वागत"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article