६ मार्चपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित ब्रह्मविद्या प्रवचन.
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
• श्रीकृष्ण महिला मंडळद्वारा प्रवचन सोहळ्याचे आयोजन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
अमरावती :- द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर माताखिडकी अमरावती येथे श्रीकृष्ण महिला मंडळाच्यावतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार ६ मार्च ते शुक्रवार १३ मार्चपर्यंत करण्यात आले आहे. प्रवचनाची वेळ दररोज सायंकाळी ६-३० ते ८ वाजेपर्यंत राहील.
घोटी, जि. नाशिक निवासी ब्रह्मविद्या विभूषित वयोवृद्ध, तपोवृद्ध प. पु. प. महंत, पुजदेकर बाबा महानुभाव, यांच्या सुमधुर वाणीतून निरूपण आयोजित करण्यात आले आहे.
या प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवारी ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष तथा महानुभाव आश्रम राजापेठ अमरावतीचे संचालक कवीश्वर कुळाचार्य आचार्य प्रवर प.पु.प. महंत मोहनराज बाबा कारंजेकर यांच्याहस्ते होणार आहे.
याप्रसंगी श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पावडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक राऊत तसेच सचिव अॅड. अरुण
ठाकरे, कोषाध्यक्ष इंजि. एस. पी. देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
या सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम शुक्रवारी १३ मार्च रोजी सकाळी १० वाजता घेण्याचे ठरले आहे. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, प.पू.प.म. आचार्यप्रवर श्री दर्यापूरकर बाबा, बडनेरा आश्रम, तसेच रिद्धपूर निवासी महंत गोपीराज बाबा शास्त्री नवे महानुभाव हे असणार आहे.
या प्रवचन सोहळ्याकरिता सर्व सद्भक्तांनी वेळेवर उपस्थित राहून ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती श्रीकृष्ण महिला Alper मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट अमरावतीच्यावतीने करण्यात येत आहे.
0 Response to "६ मार्चपासून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित ब्रह्मविद्या प्रवचन."
एक टिप्पणी भेजें