सातबारावर भोगवटदार वर्ग १ ची नोंद करण्यासाठी शिबिराचे आयोजन करा - प्रकाश देशपांडे.
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ता.जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्यातील लाखनी,साकोली, लाखांदूर, पवनी भंडारा, मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती करतात परंतु यातील काही शेतकऱ्यांच्या सातबारावर भोगवटदार वर्ग २ ची नोंद असल्याची शक्यता नाकारता येत नाही, सातबारावरील भंडारा जिल्ह्यातील भोगवटदार वर्ग २ या नोंदीमुळे धान उत्पादक शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची दस्तुरखुद शेतकऱ्यांची ओरड आहे.
धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या सातबारावरील भोगवटदार वर्ग २ चे भोगवटदार वर्ग १ मध्ये रूपांतर झाल्यास शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल आणि प्रशासनावरील विश्वास द्विगुणित होईल. याप्रकरणी शासन प्रशासनाच्या महसूल विभागाच्या अधीनस्त संबधित यंत्रणेने वेळीच दखल घेऊन एक विशेष बाब म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरीचे आयोजन या शिबिरात धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या सातबारावर भोगवटदार वर्ग २ ची असलेली नोंद निरस्त , खारीज करून त्याचे
सातबारामध्ये भोगवटदार वर्ग १ मध्ये नोंद करून भंडारा जिल्ह्यातील लाखनी साकोली लाखांदूर पवनी भंडारा मोहाडी तुमसर या तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटनेचे नेते प्रकाश देशपांडे, मोरेश्वर लेंढारे, वाल्मीक वालदे, प्रवीण कोचे, सी एम काणेकर, दामोधर उके, भागवत दामले, माधव बोरकर, परमानंद काणेकर, उमाकांत काणेकर, चंदू कांबळे, अविनाश बोरकर, अक्षय गणवीर, मनोहर बोरकर, अंकित वासनिक, प्रतीक्ष कांबळे,
धनराज तिरपुडे, जितेंद्र खोब्रागडे, विकास रंगारी, दामिनी करवडे, रूपा लेंढारे, रेखा इलमकर, कल्पना मेश्राम, वच्छला शेंडे, प्रीती राऊत, पूजा वालदे, जयश्री वालकर, नूतन देशपांडे, अरुणा दामले, वर्षा शेंडे, लता डोंगरे, अनंता रोडगे, नलू रामटेके, आशा मेश्राम, सुरेखा कोचे, मीरा बागडे, गंगासागर शहारे, राकेश मेश्राम, आकाश गजभिये, सचिन रामटेके, प्रेमसागर बडोले, कश्यप गणवीर, सोपान लांजेवार, अरुण ठवरे, नरेंद्र कांबळे यांनी केली आहे.
0 Response to "सातबारावर भोगवटदार वर्ग १ ची नोंद करण्यासाठी शिबिराचे आयोजन करा - प्रकाश देशपांडे."
एक टिप्पणी भेजें