-->
कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढा व संघर्ष करणे आमचे कार्य - पत्रकार संजीव भांबोरे

कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढा व संघर्ष करणे आमचे कार्य - पत्रकार संजीव भांबोरे


• साकोलीत दोन दिवसीय विदर्भ स्तरीय लोककला मेळाव्यात सत्कार सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे होमगार्ड परेड ग्राउंड येथे करण्यात आले होते आयोजन


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- कलाकार हे ग्रामीण भागातून तयार होत असतात व त्यांची कला म्हणजे कला असते कलेची कदर सरकारने घ्यावी त्यांना होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाटप होऊ नये हे आमचे कर्तव्य आहे असे मत पत्रकार संजीव भांबोरे यांनी दोन दिवसीय ( शनि. ०७ व रवि. ०८ मार्च ) ला विदर्भ स्तरीय लोककला मेळाव्यात साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंड येथे सत्कार प्रसंगी आपले मत व्यक्त केले.
               याप्रसंगी विदर्भस्तरीय लोककला महोत्सवाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश काळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथीत सभापती शितल राऊत, नगराध्यक्ष देवश्री कापगते, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पत्रकार डी जी रंगारी, ताराचंद कापगते, ग्रामसेवक विनोद भेंडारकर, नगरसेवक वैशाली लांजेवार, सायली दोनोडे, सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे, धनवंता राऊत, प्रेस संपादक जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, श्रीकांत नागदेवे, जेष्ठ कलावंत प्रबोधनकार अंबादास नागदेवे, तनुजा नागदेवे, विठ्ठल लांजेवार, अध्यक्ष उमेश बोरकर, शाहीर भगवान लांजेवार, शैलेश गजभिये, अभय बनसोड बी. टी. गजभिये, नारायण ऊके, शितल नागदेबे व इतर मान्यवर उपस्थित होते. येथे ज्यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे अशांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला. यात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश काळे, पत्रकार डी. जी. रंगारी, ताराचंद कापगते, अभय बनसोड, उमेश बोरकर, नगरसेवक वैशाली लांजेवार, ग्रामसेवक विनोद भेंडारकर, सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे व इतर मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. 
             याप्रसंगी कलाकारांना मार्गदर्शन करताना कलाकारांनी संघटितपणे काम करून आपल्या क्षेत्रात प्रगती करावी व अन्याय अत्याचाराचे विरोधात लढा द्यावा व आपली मागणी मागून घ्यावी स्वतःहून प्रश्न सुटत नसतात त्यासाठी लढा द्यावा लागतो असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमात भजन, तमाशा, कीर्तन, नकला, पोवाडे, लोकगीत, भीम गीत व विविध संस्थेचे कार्यक्रम असे सांस्कृतिक कार्यक्रम याप्रसंगी दोन दिवस सादर करण्यात आले. भंडारा - गोंदिया नागपूर जिल्ह्यातील जवळपास ११० मंडळांनी येथे भाग घेतला सर्व मंडळाच्या सर्व सदस्यांना प्रमाणपत्र सुद्धा वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन उमेश बोरकर यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुवर्णमाला गजभिये, शितल नागदेवे, उत्तमा गडपायले, गणेश मेश्राम, शालिनी भेंडारकर, भारती व्यास, निशा ईसापुरे, उषा राऊत, स्मिता भदाडे, मंजुषा खांडेकर, रजिया भैसारे, दुर्गा हजारे, जयश्री खानोलकर, नम्रता राऊत, दिनेश कटरे, दिनेश टेंभरे, ज्ञानेश्वर रामटेके, कुणाल बोरकर, दशरथ बोरकर, अरविंद कांबळे, चेतक मेश्राम, कैलास कापगते, प्रल्हाद बागडे, धम्मदीप सूर्यवंशी व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

0 Response to "कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढा व संघर्ष करणे आमचे कार्य - पत्रकार संजीव भांबोरे"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article