(चौ.) येथे महाराष्ट्र अंधपालांदुरश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गठित.
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ता.जनता की आवाज"
लाखनी :- तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या पालांदुर/चौ. येथे दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोज शनिवारला सभेचे आयोजन करुन शाहिद डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा पालांदूर येथे गठित करण्यात आली आहे.
यावेळी बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, अचल दामले, चंद्रशेखर भिवगडे, पुरुषोत्तम गायधने, यांच्या उपस्थितीत डी. पी. बडोले यांचे
निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अध्यक्ष मंगल बावणे, उपाध्यक्ष रामु कुंभरे, सचिन शेंडे, डी. पी. बडोले, सुभाष बडोले, अमोल शहारे, सत्यशीला शहारे, विविध उपक्रम मोनिका बडोले, मयूर शेंडे, अनु गेडाम, विद्यानंद घरडे, करुणाशिल बडोले, महेश कोचे, संकेत शेंडे, माधुरी शहारे, फुलंबाई शेंडे, विशाखा कानेकर, भारती बडोले अशाप्रकारे कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून सर्वांचे शाखेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
0 Response to " (चौ.) येथे महाराष्ट्र अंधपालांदुरश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गठित."
एक टिप्पणी भेजें