विज्ञान हे युद्धासाठी नव्हे तर मानवतेसाठी : डॉ चतुर्वेदी.
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
नागपुर रा.स.तु.म.वि.माजी.व.वि.प्रमुख डा. अल्का चतुर्वेदी
दिगंबर देशभ्रतार
"साप्ता.जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- 'विज्ञान व तंत्रज्ञान हे युद्धासाठी निर्माण झाले नसून मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झाले आहे.' असे प्रतिपादन डॉ अलका चतुर्वेदी यांनी केले.
गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयात 'रिसेंट ऍडव्हान्सेस इन बेसिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या विषयावर नुकतीच राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या बीजभाषक म्हणून रा. तु. म. नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील माजी विभाग प्रमुख डॉ अलका चतुर्वेदी उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यापुढे म्हणाल्या की, 'विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती हीच वर्तमान काळातील गरज आहे. एवढेच नव्हे तर विज्ञान हेच मानवी जीवनाचे भवितव्य आहे.'
या परिषदेच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत हे उपस्थित होते. या परिषदेतील पहिल्या सत्रामध्ये डॉ एस. जे. ढोबळे (वरिष्ठ प्राध्यापक आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ डी. व्ही. नंदनवार (मोहता सायन्स कॉलेज, नागपूर) हे उपस्थित होते.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये कराडे (प्रोफेसर व रसायनशास्त्र विभाग प्रमुख रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर डॉ शाम डफरे (रसायनशास्त्र विभाग प्रमुख जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा) हे प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
या परिषदेच्या समारोपीय सत्रामध्ये आम्ही महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ राहुल भगत यांनी मार्गदर्शन केले.
या परिषदेमध्ये अनेक प्राध्यापक व संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. या प्रसंगी संशोधन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या परिषदेमध्ये संशोधन विषयक पोस्टर्स प्रदर्शन सुद्धा भरविण्यात आले. या परिषदेचे प्रास्ताविक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख विजय वऱ्हाडे यांनी केले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले. तर प्रा दीक्षांत मस्के व डॉ प्रवीण धकिते यांनी आभार प्रदर्शन केले.
या परिषदेला विविध विद्यापीठांमधील व महाविद्यालयांमधील ३७० प्राध्यापक व संशोधकांनी नाव नोंदणी केली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "विज्ञान हे युद्धासाठी नव्हे तर मानवतेसाठी : डॉ चतुर्वेदी."
एक टिप्पणी भेजें