३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी.
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
• कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची हमी
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुंबई :- शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, अशी हमी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कलम २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्य हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. चर्चेत सत्तारूढ व विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी सहभाग घेतला होता.
राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी महाराष्ट्राने २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण जाहीर केले असून असे धोरण
राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
फेब्रुवारी ते डिसेंबर २०२५ या काळात अतिवृष्टीमुळे १.३६ कोटी शेतकरी बाधित झाले. १.०६ कोटी हेक्टर क्षेत्राचे नुकसान
'माय अॅग्री' धोरणातून एआय, ड्रोन व रोबोटिक्सचा वापर
राज्यात हवामानातील अनिश्चितता, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, उत्पादन खर्चातील वाढ व वाजारभावातील चढ-उतार यामुळे शेती अधिक जोखमीची झाली आहे. या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाय म्हणून 'माय अॅग्री' एआय धोरण आखण्यात आले आहे. या अंतर्गत हवामानाचा अचूक अंदाज, कीड-रोगाचा पूर्व इशारा, सिंचन व खत व्यवस्थापन मार्गदर्शन, बाजारभावाचा अंदाज, पीक उत्पादन वाढ होइल. यासाठी एआय, जनरेटिव्ह एआय, ड्रोन व रोबोटिक्सचा वापर होणार आहे. राज्यस्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रीटेक नावीन्य केंद्र स्थापन करण्यात आले असून चारही कृषी विद्यापीठांत एआय संशोधन व इन्क्युबेशन सुविधा उभारल्या जाणार आहेत.
झाले. यासाठी १२०, १९४ कोटींची मदत जाहीर करण्यात आली असून त्यापैकी १५,६६१ कोटी वितरित करण्यात आले आहेत. मदतीची मर्यादा २ हेक्टरवरून ३ हेक्टर वाढविण्यात आली आहे.
मोफत वीज, पानंद रस्ते आणि कर्जमाफी
'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' अंतर्गत साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्यात येत आहे. दोन वर्षांत ४१,४१५ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. 'मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना' मार्फत
नुकसानभरपाई व अतिवृष्टी मदत
राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील ९ वर्षात सुमारे ₹३७,५०० कोटीपेक्षा जास्त नुकसानभरपाई देण्यात आली आहे. खरीप २०२५-२६ पासून उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना लागू केली आहे. 'बीड पॅटर्न' ८०-११० मॉडेल राबवून विमा कंपन्यांच्या नफ्यावर २० टक्क्यांची मर्यादा घालण्यात आली आहे. वन्यप्राणी व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याची माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली.
शेतकऱ्यांना शेतापर्यंत रस्ता सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
0 Response to "३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफी."
एक टिप्पणी भेजें