राज्यसभेसाठी मविआकडून शरद पवार; काँग्रेसचाही पाठिंबा..
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?.
साप्ता."जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुंबई :- राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या ३७ जागांपैकी महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. या अनुषंगानेच आज भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आज महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आली आहे.
खासदार सुप्रिया सुळे,
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट
"महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या राजकीय भूमिका होत्या. काँग्रेसने देखील राज्यसभा आम्हाला मिळावी अशी भावना व्यक्त केली होती. मात्र, नंतर आमची सविस्तर चर्चा झाली. चर्चेत आपण महाविकास आघाडीची भूमिका घेतली पाहिजे असं अधोरेखित झालं. त्यानंतर याबाबत
केलं आहे.
महाविकास आघाडीचे मी आभार व्यक्त करते. शरद पवार यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी ही साथ दिल्याबद्दल मी महाविकास आघाडीचे आभार मानते. आम्ही उद्धव ठाकरे यांची देखील कालच भेट घेतली
मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज काँग्रेसने शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शरद पवार यांना मतदान करणार आहोत", असं हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
होती. त्यानंतर आज शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. आता उद्या शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहोत", असं सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे.
"आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आम्ही राज्यसभेच्या जागेचा आग्रह धरला होता. राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी आणि विधानपरिषदेची जागा उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, अशी आमची मागणी होती. ही मागणी आम्ही पक्षाच्या हायकमांडकडेही मांडली होती.
संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली?.
राज्यसभेसाठी शरद पवारांना काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी म्हटलं की, "काँग्रेसने महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी एक आहे, एकत्र राहील, जय महाराष्ट्र!."
0 Response to "राज्यसभेसाठी मविआकडून शरद पवार; काँग्रेसचाही पाठिंबा.."
एक टिप्पणी भेजें