दलाई लामा सोबत भारत तिबेट मैत्री संघाच्या प्रतिनिधीशी ग्रेट भेट व आशीर्वाद प्राप्त.
सोमवार, 30 मार्च 2026
Comment
• आठव्या तिबेट समर्थक समूहाच्या राष्ट्रीय संमेलनात
सक्रिय सहभाग.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- बौद्धांचे जागतिक धम्म गुरु व शांतीचे नोबल पुरस्कार प्राप्त दलई लामा यांचे 90 वे वर्ष जगभर 'करुणा वर्ष' म्हणून पाळण्यात येत आहे .याच पार्श्वभूमीवर त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभावे म्हणून भारतातील तिबेट समर्थक समूहाच्या वतीने त्यांच्या धर्मशाळा-मेकलोडगंज येथील त्सुलगखांग(न्यामग्याल) विहारात 'तेनशुक' चे अर्थात long live prayer चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दलाई लामा यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे स्नेहपूर्व आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी भारत तिबेट मैत्री संघाच्या भंडारा येथील अमृत बन्सोड ,महेंद्र गडकरी, रामकुमार गजभिये, महादेव मेश्राम एडवोकेट डी. के. वानखेडे व आहुजा डोंगरे या सहा प्रतिनिधींना मिळाली. हा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय होता. आयुष्यातील ही ग्रेट भेट व सस्नेह आशीर्वाद निरंतर त्यांच्या स्मरणात राहणार आहे.
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा व धर्मशाळेचे उपनगर मेकलोडगंज आपल्या नैसर्गिक सुंदरता, बर्फानी झाकलेले धौलादार पहाड आणि तिबेटी संस्कृती करीता प्रसिद्ध आहे. मेकलोड गंजला 'छोटा ल्हासा '(तिबेटची राजधानी) सुद्धा म्हटले जाते.१७००ते २००० मीटर पेक्षा जास्त उंचीवर वसलेले हे शहर तिन्ही बाजूने दाट देवदार वृक्षांचे जंगल आणि बर्फानी झाकलेल्या पहाडानी वेढले आहे.जेव्हा की चौथ्या बाजूने कांगडा घाटीचे अद्भुत व नयनर्रम दृश्य डोळ्याचे पारणे फेडून जाते. भारतातील सर्वात उंचीवर असलेले धर्मशाळा येथील क्रिकेट स्टेडियम समुद्रसपाटीपासून१४५७ मीटर उंचीवर असून येथून बर्फानी झाकलेल्या पाहाडाचे दृश्य अनुभवण्यासारखे आहे. तसेच धर्मशाळेपासून ८-१० किलोमीटर दूर पालमपुर रोडवरील सिंधबारी येथील सतराव्या कर्मापा लामा यांचे निवास व विहार सुद्धा पाहण्यासारखा आहे.
अशा या नैसर्गिक सुंदरतेने नटलेल्या, पर्यटकांनी गजबजलेल्या , बौद्ध धर्म व तिबेटी संस्कृतीच्या प्रतीकांनी सजलेल्या व तिबेटी निर्वासित सरकारचे मुख्यालय असलेल्या मेकलोडगंज ( धर्मशाळा )येथे दलाई लामा च्या
दीर्घायुष्यासाठी प्रार्थना कार्यक्रम (तेनशुक) बरोबरच आठव्या तिबेट समर्थक समूहाचे दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन, तिबेट समर्थक देशांची आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.
भारत तिबेट समन्वय केंद्र दिल्लीच्या निमंत्रणावरून कोर ग्रुप फार तिबेटन काज च्या वतीने धर्मशाळा येथे आयोजित आठव्या तिबेट समर्थक समूहाच्या राष्ट्रीय संमेलनात सुद्धा भंडाऱ्यातील या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता.
या दोन दिवसीय संमेलनात ग्रुप चर्चेचे तडफदार सादरीकरण भारत तिबेट मैत्री संघाचे राज्य अध्यक्ष अमृत बन्सोड यांनी केले
मॅकलोडगंज (धर्मशाळा) येथे एक दिवसीय तिबेट समर्थक
देशाची आंतरराष्ट्रीय परिषद सुद्धा पार पडली .यात जर्मनी, इटली यासह 34 देशाच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. यात कोर ग्रुपचे प्रमुख आर. के. खिरमे व भारत तिबेट मैत्री संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. डॉ. आनंदकुमार यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन झाले.
संमेलनात तिबेटची धार्मिक व सांस्कृतिक ओळख मिटविण्याच्या चीनच्या दमनकारी नीतीचा विरोध करण्यात आला , तसेच तिबेटी बौद्ध परंपरेत चिन ने हस्तक्षेप करू नये याकरिता चिंता ही व्यक्त करण्यात आली . चीन आणि तिबेटच्या निर्वासित सरकार यांच्यातील काही वर्षापासून बंद पडलेली चर्चा पुन्हा सुरू करण्याचा ठरावही पारित करण्यात आला. याशिवाय चीन द्वारा तिबेटमध्ये होत असलेले मानवाधिकाराचे हनन, तिबेटची सांस्कृतिक ओळख मिटविण्याचे चीनचे षड्यंत्र आणि तिबेटच्या पर्यावरणाचा केला जात असलेला विनाश यावर सुद्धा व्यापक चर्चा होऊन तिबेटच्या समस्येच्या समाधानाकरिता एक व्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभियान सुरू करून युनो (संयुक्त राष्ट्र संघ )व जागतिक मंचावर आवाज उठविण्याची रणनीती सुद्धा तयार करण्यावर या संमेलनात भर देण्यात आला.
0 Response to "दलाई लामा सोबत भारत तिबेट मैत्री संघाच्या प्रतिनिधीशी ग्रेट भेट व आशीर्वाद प्राप्त."
एक टिप्पणी भेजें