दुय्यम निबंधक बी.बी. रिंडे यांचेवर कारवाई करावी.
शुक्रवार, 27 मार्च 2026
Comment
• महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- साकोली येथील दुय्यम निबंधक बी.बी. रिंडे यांनी काबील कास्त प्रधानमंत्री घरकुल अज्ञान पालकधारक अकृषक आदेश नसलेल्या शेती धारकांची तसेच ३७ए, ३७बी सज्ञा लागू असलेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन आर्थिक देवाणघेवाणीतून बेकायदेशीर केलेल्या दस्त नोंदणीची चौकशी करून दस्त नोंदणी रद्द करावी. तसेच महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दुय्यम निबंधक बी.बी. रिंडे यांचेवर कारवाई करण्यात यावी. या करिता सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे नेतृत्वात तहसीलदार साकोली मार्फत मंगळवार(ता.२४ मार्च) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. महसूल मंत्र्यांकडून काय कारवाई केली जाते. याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.
दुय्यम निबंधक बी.बी. रिंडे यांचे कार्यकाळात बोगस दस्ताऐवजाच्या आधारे दस्त नोंदणीतील अर्जदारांना ब्लॅकमेल करून बेकायदेशीर प्रमाणपत्र तयार करून अनेकांची फसवणूक केली आहे. तसेच अर्थकारण करून काबील कास्त वर्ग २ ची शेती प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुल विक्री तसेच तहसीलदाराचे मनाई आदेश असलेल्या शेतीची दस्त नोंदणी या शिवाय ३७ए व ३७बी सज्ञा असलेल्या आदिवासीच्या जमिनीची दस्त नोंदणी या शिवाय अकृषक आदेश नसलेल्या व नकाशा मंजूर नसलेल्या जमिनीचे बोगस पद्धतीने प्लॉट दस्त नोंदणी करून देणे तसेच अज्ञान पालक असलेल्या शेती धारकांचे खोटे आधार कार्ड व वयाच्या प्रमाणपत्राच्या आधारे दस्त नोंदणी केली असल्याचे निवेदनात नमूद आहे. दस्त नोंदणी क्रमांक ९४५/२०२४ दिनांक ४/१०/२०२४ च्या गट क्रमांक ९६ ची दिवाणी न्यायालय साकोली येथे प्रकरण सुरू असताना तसेच तहसीलदार साकोली यांचे दस्त नोंदणीस मनाई करणारे पत्र असताना अर्थकारण करून दस्त नोंदणी केली आहे. तसेच साकोली/सेंदुरवाफा मालमत्ता क्रमांक २९३१ दस्त नोंदणी क्रमांक ११६९/२०२५ दिनांक २८/१०/२०२५ नुसार प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाची दस्त नोंदणी केली आहे. तसेच गोंडउमरी, तालुका साकोली येथील गट क्रमांक ४१३ ची अकृषक परवानगी नसतांना व नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर नसतांना बोगस दस्ताऐवजाच्या आधारे लाखो रुपये घेऊन दस्त क्रमांक ५२५/२०२३ नोंदणी केली. तसेच जमनापूर तलाठी साझा क्रमांक १२ येथील गट क्रमांक ४१४ चे मालक अनुसूचित जमाती प्रवर्गातील असताना सुद्धा आदिवासी नाहीत असे बोगस प्रमाणपत्र तयार करून दस्त नोंदणी करून दिली.
दुय्यम निबंधक बी. बी. रिंडे साकोली येथे रुजू झाल्यापासून अनेक काबील कास्त, वर्ग २ च्या शेतजमिनी बनावट दस्ताऐवजाच्या आधारे नोंदणी केली. तसेच शासकीय जागेवरील अतिक्रमित असलेल्या जागेचे बक्षिसपत्र आणि अज्ञान पालक असलेल्या शेतजमिनीची दस्त नोंदणी करून दिली असल्यामुळे सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बी.बी. रिंडे यांचे कार्यकाळातील निरीक्षण टिप्पणीची चौकशी करून नियमबाह्य नोंदणी केलेले दस्त रद्द करण्यात यावे. या करिता सामाजिक कार्यकर्ता कैलास गेडाम यांचे नेतृत्वात तहसीलदार साकोली मार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. कैलास गेडाम, डी. वाय. बडोले, विलास मेश्राम, अविनाश रंगारी, प्रमोद मेश्राम, स्वप्नील गजभिये, चिरंजीव बारसागडे, सुरेश मेश्राम, सोनू राऊत, अमृत राऊत यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
0 Response to "दुय्यम निबंधक बी.बी. रिंडे यांचेवर कारवाई करावी."
एक टिप्पणी भेजें