-->
पहेला ते निमगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा.

पहेला ते निमगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा.


 
• जिल्हा प्रशासनाचे रस्त्याकडे दुर्लक्ष पत्रकार संजीव भांबोरे यांनी नागरिकांशी केली थेट चर्चा 


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- तालुक्यातील पहेला ते निमगाव कडे जाणाऱ्या 2 मीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे. मागील पाच वर्षापासून या रस्त्यांची गिट्टी उघडलेली असून या रस्त्याने साधी सायकल चालवणे सुद्धा अवघड आहे. रात्रीला डिलिव्हरीची पेशंट सुद्धा आणणे अवघड काम आहे. या रस्त्याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु ते केराच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे. निमगाव हे गाव गोसे खुर्द बॅकवॉटरमुळे तिन्ही बाजूने वेडले असते .फक्त रस्ता तिथे बाकी असतो .तेथील लोकांची पुनर्वसनाकरिता शासनाकडे मागणी केली. परंतु शासन त्यांच्या मागणीला सुद्धा केराची टोपली दाखवीत आहे .या रस्त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की गावात जनावरे राहतात की लोक राहतात हेच कळत नाही. रात्री बे रात्री पेशंट या रस्त्याने दवाखान्यात आणायचा असला तर रस्ता बरोबर दिसत नाही केव्हाही दगावू शकतो याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न त्यांनी निर्माण केला.. युवा कार्यकर्ता शेखर कोठारे यांनी सांगितले की स्वातंत्र्याच्या 75 वर्षात वर्षांनंतर सुद्धा नागरिकांना जायला साधा रस्ता नसेल तर हे कुठले स्वातंत्र्य असा प्रश्न उपस्थित केला. त्याचप्रमाणे यांनी सांगितले की मी निमगावहून रोज येणं जाणं करतो पण माझी सायकल सुद्धा चालवायला साधा रस्ता नाही अशी परिस्थिती रस्त्याची आहे. यावेळी खुशाल गाढवे, जिनेस्वर धुळसे, चंदुलाल मोटघरे ,शिवदास भोयर व गावकरी उपस्थित होते.

0 Response to "पहेला ते निमगाव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article