पोहरा येथे आरामशीनला भीषण आग.
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ता. जनता की आवाज"
लाखनी :- तालुक्यातील पोहरा-पालांदूर राज्य मार्गावरील कीर्ती बारजवळ असलेल्या आरामशीनला ४ मार्च रोजी सायंकाळी भीषण आग लागली. यात ट्रॅक्टर, महागडी मशीनरी आणि लाकूडसाठा जळून खाक झाला. १२ ते १५ लाखांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
पोहरा येथील दिगंबर कोंडूजी अंबादे यांच्या मालकीच्या डीटीआर सॉ मिल (आरामशीन) ला सायंकाळी ५ वाजता आग लागली. मिलमध्ये
ट्रॅक्टरसह मशीनरी जळून खाक.
वाळलेले लाकूड आणि ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत
असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. आग लागल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी
१२ लाखांचे नुकसान.
धाव घेतली. उपलब्ध साधनांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. गावकरी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले. ज्यामुळे जीवितहानी टळली.
या आगीत अंबादे कुटुंबाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. जळालेल्या साहित्यामध्ये एक ट्रॅक्टर, आरामशीन, मोटार, स्टार्टर मँचेस्टर संच, वेल्डिंग मशीन, बाळ मशीन, दोन ट्रॉली, इमारतीचे बांधकाम, टिनपत्रे आणि लाकूडसाठा यांचा
समावेश असून नुकसान १२ ते १५ लाख रुपयांच्या घरात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक बारसे, साहाय्यक फौजदार सुरेश आत्राम आणि पोलीस शिपाई लक्ष्मीकांत झलके यांनी पंचनामा केला. वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय आणि क्षेत्र साहाय्यक जे.एम. बघेले यांनी नुकसानीची पाहणी केली. या संकटामुळे अंबादे कुटुंब उघड्यावर आले असून शासनाने त्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
0 Response to "पोहरा येथे आरामशीनला भीषण आग."
एक टिप्पणी भेजें