-->
फाल्गुन पौर्णिमा

फाल्गुन पौर्णिमा

 
       फाल्गुन पौर्णिमेला पाली भाषेत 'फग्गुन मासो' म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः मार्च महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या पुढील प्रमाणे.

          कपिलवस्तूस भगवंतांची भेट

       भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर राजा शुद्धोदनाने निरोप पाठविला की," मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे.त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही."
      पित्यासमोर भगवंत बसताच राजा शुद्धोदनाच्या भावना उचंबळून आल्या. त्याला स्वतःच्या मुलाचा अभिमान वाटत होता.तो दुःखात आनंद आणि आनंद दुःख म्हणू लागला. पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या.
   शुद्धोधन म्हणाला," मी तुला माझे राज्य देईल, तरी ते तू मातीमोल मानशील". यावर भगवंत म्हणाले," आपल्या पुत्राबद्दल आपणास अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो.पण ज्या पुत्राला आपण  मुकलात त्याच्याशी ज्या प्रेम बंधनांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्राशी जखडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल."

पुत्र राहुलची धम्मदीक्षा.

       सारिपुत्त यांच्याकडे वळून भगवंत म्हणाले," माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी देऊ शकत नाही,परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मी मात्र त्याला देऊ शकेल."
        राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले," सोने, रूपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु अध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका व जतन करण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे अध्यात्मिक धन  म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय???

          नंद याची धम्मदीक्षा.

     सिद्धार्थ गौतमाचा सावत्र व मावस भाऊ म्हणजे नंद.तो महाप्रजापती गौतमीचा पुत्रत्न होता.महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थास दुग्धपान करविले आणि आपले बाळ नंद यास दाईच्या हवाली केले.नंदला योग्य वळणावर आणण्यासाठी बुद्धांनी प्रयत्न केला.नंदची प्रवज्जा ही फाल्गुन पौर्णिमेला झाली होती.

          अशा या फाल्गुन पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय सदिच्छ!.
   ( संदर्भ- भीमनिर्णय दिनदर्शिका,2020,माहे- मार्च.)

                शुभेच्छुक.
       आयु- प्रशांत चव्हाण सर.
               केंद्रीय शिक्षक.
          भारतीय बौद्ध महासभा
             श्रीगोंदा तालुका.

0 Response to "फाल्गुन पौर्णिमा"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article