HPV ह्युमन पापिलोमा व्हायरस च्या "जबरदस्ती लसीकरणा" विरोधात दिघोरी(आमगाव)ग्रामपंचायत मध्ये ठराव पारित.
मंगलवार, 10 मार्च 2026
Comment
• ठराव पारित करणारी ठरली भारतातील पहिली ग्रामपंचायत.
• इलेक्ट्रिक मॅन अभय डी रंगारी च्या प्रबोधनाला मिळाले जनतेच्या दरबारात यश.
• कोणीही जबरदस्ती करीत असल्यास अभय डी रंगारी यांच्या केंद्रीय जनसंपर्क कार्यालयास संपर्क साधण्याचे आव्हान.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- शासनाने 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना HPV ह्युमन पापिलोमा व्हायरस लसीकरण देण्याचा निर्णय घेतला आहे, कॅन्सर विरोधात ही लस असल्याचे सांगितले जाते, मात्र अनेकांनी यावर अविश्वास दाखवून ही लस घेण्यात विरोध केला आहे, अनेक डॉक्टरांनी सुद्धा यावर आक्षेप घेतला आहे, लसीचे लाभ कमी आणि नुकसान जास्त असू शकतात असा सूर निघत आहे, मात्र ही लस अनिवार्य नसून सुद्धा संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, व शाळेतील शिक्षक हे पालक व मुलीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे दबाब टाकू शकतात असे पालकांचे म्हणणे आहे
या जबरदस्ती च्या लसीकरणा विरोधात ""इलेक्ट्रिक मॅन"" अशी जनतेने उपाधी दिलेले युवकांच्या हृदयातील ""स्टार"" अभय डी रंगारी यांनी आपल्या प्रबोधनातून सत्य ते काय याची जाणीव जागृतीकरून लोकांना सचेत केले ,आणि सांगितले की ,
आरोग्याच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने औषध ,लस देणे हे कायदेशीर गुन्हा ठरू शकते. कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीरावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
संविधानानुसार अधिकार
Article 21 of the Constitution of India
या कलमानुसार प्रत्येक व्यक्तीला जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
यात शरीरावर स्वतःचा हक्क (Bodily autonomy) समाविष्ट आहे.
त्यामुळे व्यक्तीच्या संमतीशिवाय औषध ,लस, इंजेक्शन किंवा उपचार देणे हा अधिकार भंग मानला जाऊ शकतो.
भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा
Section 351 of the Indian Penal Code – Assault
एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक कृती करण्याचा प्रयत्न किंवा धमकी.
Section 352 of the Indian Penal Code – Assault or criminal force
परवानगी नसताना शरीरावर जबरदस्ती करणे.
Section 328 of the Indian Penal Code
हानीकारक पदार्थ किंवा औषध,लस जबरदस्तीने देणे.
शिक्षा: १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
वैद्यकीय कायद्यानुसार (Consent)
आरोग्य क्षेत्रात Patient Consent (रुग्णाची संमती) खूप महत्त्वाची आहे.
डॉक्टर किंवा कोणतीही व्यक्ती रुग्णाची संमती घेतल्याशिवाय उपचार करू शकत नाही.
याला Informed Consent म्हणतात.
अपवाद (काही परिस्थितीत परवानगी असते)
काही वेळा जबरदस्ती उपचार कायदेशीर असू शकतात:
रुग्ण बेशुद्ध असेल आणि जीव वाचवण्यासाठी तातडीचा उपचार आवश्यक असेल
मानसिक आरोग्याच्या विशेष परिस्थिती
संसर्गजन्य रोग पसरू नये म्हणून सरकारी आदेश
(उदा. Mental Healthcare Act 2017 अंतर्गत काही नियम)
मात्र HPV लसीकरण करणे अनिवार्य असल्याचे कोणत्याही प्रकारचा आदेश सरकार कडून नसताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ही जबरदस्ती होऊ नये म्हणून याविषयी चा सवाल इलेक्ट्रिक मॅन अभय डी रंगारी यांनी उपस्थित केला ,यापूर्वी अभय डी रंगारी ने जबरदस्ती स्मार्ट मीटर विरोधात ग्रामसभा ठराव मोहीम हाती घेतली होती जिचे पडसाद संपूर्ण भारतात सर्वत्र पसरले होते,
""ना राज्यसभा,ना लोकसभा, सबसे बडी ग्रामसभा"
असा नारा देऊन ग्रामसभेचे महत्त्व अभय रंगारी यांनी लोकांच्या लक्षात आणून दिले
त्याचा असा परिणाम झाला की गावातील लोकांनी यापूर्वी कोरोना लस दबावाने घेतली होती त्याचा दुष्परिणाम आता दिसत आहेत,त्यामुळे गावातील लोकांनी ग्रामसभेत HPV लसीकरण जबरदस्ती च्या विरोधात ठराव घेतला की HPV लसीकरणा विषयी कोणीही जबरदस्ती करु नये,
- जर कोणीतरी जबरदस्तीने औषध लस देत असेल तर तुम्ही:
1. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकता.
2. आरोग्य विभाग किंवा वैद्यकीय परिषद कडे तक्रार करू शकता.
3. आवश्यक असल्यास न्यायालयात दाद मागू शकता.
4. डॉक्टरांनी जबरदस्ती उपचार केला तर कायदेशीर कारवाई कशी करावी
कुणालाही त्याच्या इच्छेविरुद्ध औषध देणे हा गुन्हा ठरू शकतो.
लागू होणारी कलमे:
Section 328 of the Indian Penal Code
एखाद्याला हानीकारक पदार्थ किंवा औषध जबरदस्ती देणे.
शिक्षा :- १० वर्षांपर्यंत तुरुंगवास व दंड.
Section 352 of the Indian Penal Code
परवानगीशिवाय शारीरिक जबरदस्ती करणे.
Article 21 of the Constitution of India
• व्यक्तीच्या जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार भंग.
• डॉक्टर किंवा संबंधित अधिकारी जबरदस्ती उपचार करत असतील
• डॉक्टरांनी उपचार करण्यापूर्वी रुग्णाची संमती (Consent) घेणे आवश्यक आहे.
• जर डॉक्टरांनी संमतीशिवाय उपचार केले तर ते Medical Negligence किंवा Misconduct ठरू शकते.
अशा वेळी तक्रार करता येते:
1. जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO)
2. राज्य वैद्यकीय परिषद
3. ग्राहक न्यायालय (Consumer Court)
तक्रार कुठे करावी
1. जवळचे पोलीस स्टेशन – FIR दाखल करा
2. जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO)
3. न्यायालयात तक्रार
पोलिसांना देण्यासाठी साधा अर्ज नमुना
प्रति,
पोलीस निरीक्षक
________ पोलीस स्टेशन
विषय: जबरदस्तीने औषध ,लस देण्याबाबत तक्रार
महोदय,
मी _______ (नाव) राहणार _______.
माझ्या इच्छेविरुद्ध _______ (व्यक्तीचे नाव) यांनी मला जबरदस्तीने औषध/गोळ्या देण्याचा प्रयत्न केला किंवा करत आहेत,यामुळे माझ्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
ही कृती भारतीय दंड संहितेतील कलम 328 व इतर संबंधित कलमानुसार गुन्हा आहे. कृपया या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी.
धन्यवाद.
आपला विश्वासू
नाव: _______
पत्ता: _______
मोबाईल: _______
दिनांक: _______
0 Response to "HPV ह्युमन पापिलोमा व्हायरस च्या "जबरदस्ती लसीकरणा" विरोधात दिघोरी(आमगाव)ग्रामपंचायत मध्ये ठराव पारित."
एक टिप्पणी भेजें