-->
लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 ,15, 16 एप्रिल ला विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 ,15, 16 एप्रिल ला विविध कार्यक्रमाचे आयोजन.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- भारतरत्न ,बोधिसत्व, विश्वरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे 14, 15 ,16 एप्रिल विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ञा बुद्ध विहार समितीतर्फे करण्यात आलेले आहे. 14 एप्रिल ला सकाळी ९ वाजता लोमेश्वर रामटेके सेवानिवृत्त उपप्राचार्य मुंबई यांचे हस्ते दीप प्रज्वलन होईल. बौद्ध पूजा व पवित्र पाठ श्री इंदुरकर सर धम्मचारी वडसा यांच्या गोड वाणीतून होईल. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनोज बनसोड, प्रमोद हुमणे, बबीता गजभिये उपस्थित राहतील.मुख्य मार्गदर्शक म्हणून आरती कोरडे उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे अन्य मान्यवर उपस्थित राहतील. 1 वाजता पूज्य भदंत राहुल बोधी आरमोरी यांच्या हस्ते परित्राण पाठ धम्मदेशना संपन्न होईल. सायंकाळी ४ वाजता बौद्ध उपासक उपासिका यांचे उपस्थितीत भव्य धम्म रॅली, सायंकाळी ७ वाजता बुद्ध वंदना, व रात्री ८ वाजता धम्मदेशना, रात्री ९ वाजता लिंबिनि भीमगीत गौराळा यांच्या कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ पुष्परता मरगडे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विलास चाचेरे तर उपाध्यक्ष म्हणून दिपाली बनपुरकर राहतील. विशेष अतिथी म्हणून किशोर सावरबांधे उद्योजक उपस्थित राहतील. 
15 एप्रिल ला सकाळी ७ वाजता सामूहिक बुद्ध वंदना व धम्मदेशना, दुपारी १२ वाजता सामाजिक प्रबोधन कार्यक्रम होईल. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, चंद्रमणी गायकवाड सामाजिक कार्यकर्ता, परमानंद मेश्राम सामाजिक कार्यकर्ता ,अचल मेश्राम सामाजिक कार्यकर्ता भंडारा ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोशन फुले समता सैनिक अध्यक्ष लाखांदूर तालुका उपस्थित राहतील. 
सायंकाळी ७ वाजता सामूहिक बुद्ध वंदना व धम्मदेशना ,रात्री ९ वाजता भव्य संगीत समाजप्रबोधन कार्यक्रम प्रस्तुत करते प्रशिक गायन पार्टी व त्यांचा संच शिरोली ,यावेळी उद्घाटक म्हणून युवराज सुखदेवे, मिलिंद सिंहगडे,, गिरीश भागडकर उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे अन्य मान्यवर सुद्धा उपस्थित राहतील. 16 एप्रिल ला सकाळी ७ वाजता बुद्ध वंदना , दुपारी १२ वाजता धम्म देशना समारोपीय कार्यक्रम दुपारी २ वाजता होईल. पुढील कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर महावाडे ,रामदास बेहेरे, रसिका ताई रंगारी जि प सदस्या उपस्थित राहतील ‌.प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय बनसोड विभागीय अध्यक्ष बुद्धिस्ट सोसायटी नागपूर, चंद्रभान रामटेके मुख्य संपादक बेरोजगार संदेश नागपूर उपस्थित राहतील.
16 एप्रिल ला ९.३० वाजता समाज प्रबोधन संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन युवा भीम गर्जना स्वर मंच देसाईगंज वडसा गायक युवराज प्रधान प्रस्तुत यांचा आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नानाभाऊ पटोले साकोली विधानसभा क्षेत्र, सहउद्घाटक म्हणून ए बी कॅरीअर प्रायव्हेट लिमिटेड रेतीघाट ठेकेदार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदीप बुरडे अध्यक्ष काँग्रेस कमिटी लाखांदूर ,जितु पारधी पंचायत समिती सदस्य लाखांदूर ,विशेष अतिथी म्हणून सुधीर रामटेके उपस्थित राहतील. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रज्ञा बुद्ध विहार चे अध्यक्ष प्रशांत मेश्राम, उपाध्यक्ष भोजू घरडे, सचिव वाल्मीक घरडे यांनी केलेले आहे.

0 Response to "लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 ,15, 16 एप्रिल ला विविध कार्यक्रमाचे आयोजन. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article