तुमसरात मे महिन्यात ५०० हून अधिक कुटुंबांना मिळणार घरांचे पट्टे.
बुधवार, 8 अप्रैल 2026
Comment
•आमदार राजू कारेमोरे व नगराध्यक्ष सागर गभने यांच्या पाठपुराव्याला यश; २६ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा.
• नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांची तहसीलदारांशी बैठक; विकासकामांवर सखोल चर्चा.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला घरांच्या पट्ट्यांचा प्रश्न आता अखेर मार्गी लागणार आहे. येत्या मे महिन्यात तुमसर शहरातील विविध प्रभागांतील ५०० हून अधिक पात्र कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घरांचे पट्टे वितरित करण्यात येणार आहेत. या संदर्भात नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी आज तुमसरचे तहसीलदार उपेश अंबादे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
माता रमाई परिसरात ‘भिक्षु निवास’ व ‘विपासना केंद्र’ प्रस्तावित.
नगराध्यक्षांनी सामाजिक व आध्यात्मिक गरजांचा विचार करून ( प्र.क्र -1 ) कुंभारे नगर येथील माता रमाई परिसरात.
विपासना ध्यान केंद्रयासाठी जागा आरक्षित करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली. या उपक्रमामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होऊन नागरिकांना ध्यानधारणेसाठी योग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शहरातील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असूनही त्यांच्या नावावर मालकी हक्काचे पट्टे नव्हते. या प्रश्नासाठी नगराध्यक्षांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
आज झालेल्या चर्चेनंतर, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांना मे महिन्यात पट्टे वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
"शहरातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे घर मिळावे, हे आमचे प्रमुख ध्येय आहे. मे महिन्यात 530 पट्ट्यांचे वितरण करून आम्ही त्या दिशेने ठोस पाऊल टाकत आहोत. तसेच माता रमाई परिसरातील सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांसाठी जागा आरक्षित करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे."असे प्रतिनिधी द्वारे कळले आहे.
0 Response to "तुमसरात मे महिन्यात ५०० हून अधिक कुटुंबांना मिळणार घरांचे पट्टे."
एक टिप्पणी भेजें