प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद मोरे यांना "महाकवी वामनदादा कर्डक राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार" 2026 जाहीर.
बुधवार, 8 अप्रैल 2026
Comment
सदानंद मोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा :- अकोला सदानंद मोरे अकोला: तेल्हारा तालुक्यातील दापुरा येथील प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद मोरे यांना" अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व सांस्कृतिक संवर्धन महामंडळ ह्युमन राईट असोशियन ऑफ इंडिया (तेलंगणा राज्य) यांच्यावतीने महाकवी वामनदादा कर्डक राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज भीम शाहीर प्रबोधनकार सदानंद मोरे यांनी सामाजिक, कला, ग्रंथालय, पत्रकारिता क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय मुलाचे कार्य केले आहे. हा राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक-29 एप्रिल 2026 रोजी दुपारी दोन वाजता गोळेगाव मंडल, किरा मेरी जिल्हा कुमराव भीम, असिफाबाद तेलंगणा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भीम शाहीर सदानंद मोरे यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून क्रांतिकारी महापुरुषांचे विज्ञानवादी विचार मांडून, बुद्ध भीम गीतांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम करीत आहे. पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटून त्यांच्या कार्याची दखल घेत यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक समिती अध्यक्ष-तारू नगरा रे, दत्तू ताकसांडे, प्रधान कार्यकर्ता एम शंकर, टि आनंदराव, कवी साहित्यिक मधुबावलकर, एडवोकेट सत्यपाल काटकर, भिमशाहिर प्रबोधनकार प्रदीप कडबे, यांनी जास्तीत जास्त संख्येने कलावंतांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to "प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार सदानंद मोरे यांना "महाकवी वामनदादा कर्डक राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार" 2026 जाहीर."
एक टिप्पणी भेजें