प्राइड ऑफ भारत इंडिया (नॅशनल अवॉर्ड)2026 महंत श्री.गोपालव्यास कपाटे यांना जाहीर.....
शुक्रवार, 17 अप्रैल 2026
Comment
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- स्वराज्य फिल्म प्रॉडक्शन सोशल फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा (प्राइड ऑफ भारत इंडिया,नॅशनल अवॉर्ड)महंत श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांना नुकताच जाहीर झाला असून हा नामांकित पुरस्कार सोहळा 28 जुन 2026 रोजी पुण्यात,पिंपरी चिंचवड (CONRAD TREE HOTEL)येथे मोठ्या दिमाखात संपन्न होणार असुन याप्रसंगी विविध क्षेत्रातील प्रमुख दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत या दिमाखदार सोहळ्याचे आपण साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे म.श्री.गोपालव्यास कपाटे यापूर्वीही अनेक नामवंत राज्यस्तरीय,राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे त्यामधे प्रामुख्याने दादासाहेब फाळके,महाराष्ट्र भुषण,समाजरत्न, मनिरत्न शिक्षक गौरव इत्यादी अनेक नामवंत पुरस्कार प्राप्त झाले आहे, गेल्या पंचवीस तीस वर्षापासून
महंत.श्री.गोपालव्यास सातत्याने अंधश्रद्धा, कर्मकांड, व्यसनमुक्ती,सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.ह्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन हा नामांकित पुरस्कार जाहीर झाला आहे.आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना महंत.श्री.गोपालव्यास म्हणाले क्षेत्र कुठलेही असोत त्यामधे प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, सातत्य,पारदर्शकता महत्वाची आहे. हे सगळे कार्य करीत असतांना अनेक वेळेस लोकनिंदा ऐकून घेण्याची मानसिकता पण ठेवावी लागते, प्रस॔गी संघर्षसुध्दा करावा लागतो आता पर्यंताचा इतिहास बघीतला तर संतांनाच खुप त्रास सहन करावा लागला.महंत.श्री.गोपालव्यास हे स्पष्ट, निर्भीड वक्ते आहेत हे सर्वदूर प्रसिद्ध आहे.... या पुरस्कार वितरण समारंभासाठी भारतातील विवीध राज्यातून मान्यवर येणार आहे.विवीध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांसह अनेकांनी महंत.श्री.गोपालव्यास यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या
0 Response to "प्राइड ऑफ भारत इंडिया (नॅशनल अवॉर्ड)2026 महंत श्री.गोपालव्यास कपाटे यांना जाहीर....."
एक टिप्पणी भेजें