-->
लोभी येथे' पंचशील बौद्ध विहार' समाज मंदिराचे लोकार्पण.

लोभी येथे' पंचशील बौद्ध विहार' समाज मंदिराचे लोकार्पण.

.                  उपस्थितीत पो.नि.शरद शेवाळे

       दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नाकाडोगंरी/तुमसर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजीच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून, तुमसर तालुक्यातील लोभी येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत नवनिर्मित 'पंचशील बौद्ध विहार व समाज मंदिरा'चे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जि. प. सदस्य राजू धनराम देशभ्रतार यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा परिषद स्तरावरील निधीतून हे समाजोपयोगी काम पूर्ण करण्यात आले आहे.

या वास्तूचे लोकार्पण गोबरवाही पोलीस ठाण्याचे पो. नि. शरद शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य (आष्टी क्षेत्र) राजू देशभ्रतार यांची उपस्थिती होती. लोभी येथील समाज बांधवांची गेल्या अनेक दिवसांपासून

बौद्ध विहार व समाज मंदिराची मागणी होती. ही गरज ओळखून राजू देशभ्रतार यांनी जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करून १५ व्या वित्त आयोगातून हा निधी उपलब्ध करून दिला. आज या देखण्या वास्तूचे लोकार्पण झाल्याने गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काची जागा उपलब्ध झाली आहे.कार्यक्रम लोकार्पण प्रसंगी ग्रामस्थ व अनेक मान्यवरानीं उपस्थिती दर्शविली हे विषेश.

या सोहळ्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील युवक आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. लोकार्पणानंतर उपस्थित समाज बांधवांनी या नव्या वास्तूचे कौतुक करत राजू देशभ्रतार यांचे आभार मानले.

0 Response to "लोभी येथे' पंचशील बौद्ध विहार' समाज मंदिराचे लोकार्पण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article