-->
साकोली येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजन.

साकोली येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजन.


•साकोली येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव तसेच एशियन व भीम पर्व टीव्ही चॅनलच्या वर्धापन दिन 20 एप्रिल ला आयोजन 

           संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- साकोली येथील होमगार्ड परेड ग्राउंड येथे सायंकाळी 6.00 वाजता महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव तसेच भीमपर्व व एशियन टीव्ही चॅनलच्या वर्धापन दिनाचे आयोजन 20 एप्रिल 2026 ला करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे भीमगर्जना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आदिवासी गाण्याचे गायक राजू उईके नागपूर व प्रबोधनकार सुभाष कोठारे आणि संच नागपूर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार नानाभाऊ पटोले यांचे हस्ते करण्यात येईल तर सह उद्घाटक म्हणून आमदार परीनय फुके , सोमदत्त करंजेकर अध्यक्ष वैनगंगा शैक्षणिक संस्था, राजकुमार बडोले आमदार अर्जुनी मोरगाव उपस्थित राहतील .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनील फुंडे अध्यक्ष डिस्ट्रिक्ट सेंटर को-ऑपरेटिव बँक भंडारा हे उपस्थित राहतील .दीप प्रज्वलन डॉ हेमकृष्ण कापगते माजी आमदार ,सौ शितल राऊत  सभापती भंडारा यांचे हस्ते होईल. सहदीप प्रज्वलक देवश्री कापगते नगराध्यक्ष साकोली, डॉ.सुरेश खोब्रागडे साहित्यिक व विचारवंत भंडारा प्रा डॉ शंकर बागडे साहित्यिक व विचारवंत प्रकाश बाळबुद्धे माजी प्राचार्य होमराज  कापगते,  यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. प्रमुख अतिथी म्हणून सभापती ललित हेमने, उपसभापती  करूनाताई वालोदे , जि प सदस्य नेपाल भाऊ रंगारी ,जि प सदस्य माजी मदन रामटेके ,माजी अनिल किरणापुरे नगरपरिषद उपाध्यक्ष  रोहिणी मंगलमारे , नगरसेवक संदीप बावनकुळे ,सपान कापगते ,पंकज मुंगूलमारे, धनवंत राऊत , पत्रकार संजीव भांबोरे , डॉ. अक्षय कहालकर, पत्रकार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बैस , पत्रकार संजय साठवणे,पत्रकार मनीषा काशीवार ,पत्रकार आशिष शेडगे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवशंकर टेंभरे, पत्रकार अशोक गुप्ता ,, प्रकाश राणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ग्यानचंद जांभुळकर, मूलचंद कूकडे , वंचित बहुजन आघाडीचे तनुजा नामदेवे, शेषराव रामटेके, दिलीप वानखेडे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सुद्धा करण्यात येईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन एस एन न्यूज व भीम पर्व चॅनेलचे मुख्य संपादक डी जी रंगारी, संचालक अश्विन रंगारी, न्यूज अँकर पूजा वासनिक, शितल नागदेवे, कॅमेरा मॅन शुभम खांडेकर, यांनी केलेले आहे.

0 Response to "साकोली येथे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article