दत्तशिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांना देवाज्ञा.
सोमवार, 6 अप्रैल 2026
Comment
. मंहत मधुसूदन भारती
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- माहूर दत्तशिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांची प्रकृती ६ महिन्यांपासून खालावली होती. मध्यंतरी त्यांच्या तब्येतीत सुष् धारणा झाली होती, परंतु ४ एप्रिल रोजी ५ वाजता त्यांना देवाज्ञा झाली. ही वार्ता पंचक्रोशीत पसरताच महंत महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. ते शिवसमयी ९५ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर दत्तशिखर येथे ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दत्तशिखर संस्थान, माहूरगड चे ३० वे महंत महाराज परमपूज्य मधुसूदन भारती (गुरु अच्युत भारती महाराज) (६६) हे १६७८ रोजी
शिखर संस्थान येथे विराजमान झाले होते ते आजपर्यंत होते. त्यांना ४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता देवाज्ञा झाल्याची दुःखद घटना घडली. त्यांचा अंत्यविधी पारंपारीक रुढी परंपरा व धार्मिक विधी पूर्ण करीत दत्तशिखर संस्थान येथे होणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
0 Response to "दत्तशिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांना देवाज्ञा."
एक टिप्पणी भेजें