शशिकांत भोयर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड.
बुधवार, 8 अप्रैल 2026
Comment
• व्हॉईस ऑफ मीडिया ची भंडारा येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न.
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- भारत देशात ४ लाख ७०
हजार पत्रकार सदस्य असलेली आंत-रराष्ट्रीय रव्हॉईस ऑफ मीडियार या संघटनेची काल (मंगळ. ०७ एप्रिल ) ला भंडारा येथील ऑफीसर्स क्लब भवनात एक जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यामध्ये लोकशाही न्यूज टिव्हीचे जिल्हा प्रतिनिधी शशिकांत भोयर यांची
भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे येथे पुष्पगुच्छ देत स्वागताभिनंदन करण्यात आले.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य संघटक किशोर कारंजेकर, राज्य संघटक, विदर्भविभाग अध्यक्ष
व्यंकटेश दुड्डमवार, गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष विलास ढोरे, तथा साकोली व्हॉइस ऑफ मीडियाचे आशिष चेडगे
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. येथे किशोर कारंजेकर यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशन पंढरपूरात महाराष्ट्रातील हजारो पत्रकार सदस्यांची लाक्षणिक उपस्थिती होती. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही आंतरराष्ट्रीय संघटना पदोपदी झटत आहे. नुकतेच पत्रकारांच्या मुलांना एमपीएससी व यूपीएससीचे मोफत शिक्षणासाठी पुणे येथे करार करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय संस्थापक
• अध्यक्ष संदीप काळे यांच्या पुढाकाराने त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वरिष्ठ पदाधिकारींनी भंडारा जिल्हा अध्यक्षपदी लोकशाही टिव्ही न्यूजचे शशिकांत भोयर यांची भंडारा जिल्हाध्य-क्षपदी निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र लाईव्ह न्युजचे प्रतिनिधी मदन कमाने, सी व्ही नाईनचे संपादक अमृतलाल चरडे, जय महाराष्ट्र चे जिल्हा प्रतिनिधी सुरज बागडे, टीव्ही नाईन मराठीचे रुपेश सपाटे, पुढारी टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे, बीबीएम चे जिल्हा प्रतिनिधी मुकेश केवट, दैनिक संदेशचे मुख्य संपादक अनमोल मेश्राम, दै. युवाराष्ट्र दर्शनचे जिल्हा प्रतिनिधी विलास सुदामे, जीबी न्यूजचे संचालक राकेश श्यामकुंवर, सुशील चौधरी, न्यूज टुडेचे भंडारा तालुका पत्रकार कमलेश मेश्राम, शिवा नागदेवे, लोकमतचे अड्याळ वार्ताहर विशाल रणदिवे आदी मान्यवर या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते.
0 Response to "शशिकांत भोयर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड."
एक टिप्पणी भेजें