सौ.सुनैनाताई संदीप मेश्राम सदस्य पदासाठी नामनिर्देश.
रविवार, 12 अप्रैल 2026
Comment
कांदरी येथे अनुसूचित जाती स्त्री गटातून सौ.नैनाताई संदीप मेश्राम सदस्य पदासाठी यांचे नामनिर्देश दाखल.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा/मोडाळी :- कांद्री येथे दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मा.आमदार राजुभाऊ कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र तथा सौ. अनिताताई रमेश नलगोपुलवार महिला व बालकल्याण सभापती भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 10/04/2026 रोजी,
सौ. सुनैनाताई संदीप मेश्राम यांनी निवडणूक अधिकारी, मोहाडी येथे आपले अनुसूचित जाती स्त्री गटातून सदस्य पदाकरीता नामनिर्देशन दाखल केले.
यावेळी सुनिलजी मेश्राम, दिनेशजी जगनाडे, विलासजी बालपांडे, संदीपजी मेश्राम, चंद्रप्रकाशजी मोहनकर बूथ प्रमुख देऊळगाव, विनोदजी इनवाते, रणजीत उचिबगले,चंदू कारेमोरे , सविता बालपांडे, हर्षविणा मोहनकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कांद्री गावच्या विकासासाठी, जनतेच्या प्रश्नांसाठी आणि प्रगतीसाठी सर्वसाधारण महिला उमेदवार सौ.सुनैना संदीप मेश्राम (वॉर्ड क्रमांक 5 सदस्य पदाचे उमेदवार) यांना आपल्या सर्वांच्या विश्वासावर एक नवीन पाऊल उचलून गावाच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहील.
विजय निश्चित!..
0 Response to "सौ.सुनैनाताई संदीप मेश्राम सदस्य पदासाठी नामनिर्देश."
एक टिप्पणी भेजें