तुमसरात आज मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर.
रविवार, 12 अप्रैल 2026
Comment
•आ.राजूभाऊ कारेमोरे व नगराध्यक्ष सागर गभने आयोजित चालता फिरता दवाखाना अंतर्गत आरोग्य व रोग निदान शिबिराचे आज तुमसरात आयोजन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा/तुमसर :- आमदार राजूभाऊ माणिकरावजी कारेमोरे व नगराध्यक्ष इंजि.सागर विद्या मनोहर गभने मित्र परिवार तर्फे
आयोजित चालता फिरता दवाखाना अंतर्गत आरोग्य व रोग निदान शिबिराचे आयोजन दि:-12 एप्रिल 2026 रोज रविवार ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आंबेडकर नगर तुमसर येथे सकाळी १० ते दुपारी 1 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे शिबिराचे लाभ घेऊन रोग निदान करून घ्यावे व शिबिराची माहिती जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून रुग्णांना निशुल्कपणे शस्त्रक्रियेयेचा (ऑपरेशनच) लाभ घेता येईल.
टिप :- शिबिरामध्ये औषध आय ड्रॉप निशुल्क वाटप करण्यात येणार आहे व ऑपरेशन ला जाणाऱ्या प्रत्येक रुग्णांची जाण्या- येण्याची सोय जेवणाची सोय निशुल्क करण्यात येणार आहे
अधिक माहिती साठी संपर्क
7218903711
8390366136
विनंती :- शिबीराची माहिती जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची कृपा करावी
0 Response to "तुमसरात आज मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर."
एक टिप्पणी भेजें