-->
आईच्या स्मृतीस उजाळा--आईसारखे दैवत नाही...!

आईच्या स्मृतीस उजाळा--आईसारखे दैवत नाही...!

.                  कै.सुदंराबाई दतात्रय कपीले.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा/तुमसर :- आई.... हा शब्द जसा उच्चार होतो. तसंच मनात एक वेगळीच उर्जा निर्माण होते. आई म्हणजे केवळ एक नातं नाही, तर ती प्रेम, माया, त्याग आणि पवित्रतेच जिवंत रूप आहे. आई.... तुझ्याच मूर्ती या वाक्यात तिच्या महानतेचं, तिच्या निरपेक्ष प्रेमाचं आणि तिच्या अद्वितीय अस्तित्वाचं अत्यंत सुंदर वर्णन सामावलेला आहे. आई म्हणजे एक आदर्श, पवित्र आणि सुंदर रूप जे शब्दात पूर्णपणे व्यक्त करणं खरोखरच कठीण आहे. आईच्या मायेची सावली ही जगातील सर्वात सुरक्षित जागा असते. लहानपणी आपण पडतो, रडतो, घाबरतो तेव्हा धावत येणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई... तिच्या कुशीत मिळणारा आधार तिच्या हाताने दिलेला स्पर्श आणि तिच्या शब्दातील प्रेम हे कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी असते. ती आपल्या लेकरांसाठी स्वतःच्या सुखदुःखांचा कधीही विचार करत नाही. तिचं जग तिच्या मुलाभोवतीच फिरत असतं......! आईचं प्रेम हे निस्वार्थ असतं ती कधीही काही परतफेडीच अपेक्षा ठेवत नाही. आपल्या लेकरांनी आनंदी राहावं, यशस्वी व्हावं, चांगले माणूस बनाव हीच तिची एकमेव इच्छा असते. तिच्या प्रत्येक कृतीत त्याग दडलेला असतो. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ती आपल्या कुटुंबासाठी झटत राहते. तिच्या कष्टाची तिच्या सहनशीलतेची आणि तिच्या प्रेमाची तुलना कधीच कोणाशीच होऊ शकत नाही. आई म्हणजे संस्काराची शाळा आहे ती आपल्याला चालायला शिकवते बोलायला शिकवते आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे योग्य अयोग्य यातील फरक समजावते. तिच्या शिकवणीतूनच आपलं व्यक्तिमत्व घडतं तिच्या प्रत्येक शब्दात जीवनाचा अनुभव असतो. आणि तिच्या प्रत्येक कृतीत एक शिकवण दडलेले असते. म्हणूनच आई केवळ जन्मदात्री नसून ती आपल्या आयुष्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची गुरु असते. काळ बदलतो, परिस्थिती बदलते पण आईचं प्रेम कधीच बदलत नाही. आपण मोठे होतो. आपापल्या आयुष्यात व्यस्त होतो. पण आईचे मन मात्र नेहमी आपल्या लेकरांभोवतीच फिरत असतं. आपण कितीही दूर गेलो तरी तिच्या आशीर्वादाची सावली नेहमी आपल्या सोबत असते. तिचं प्रेम हे आकाशासारखं विशाल आणि समुद्र सारखा अथांग असते. आईचं स्थान या जगात सर्वात उंच आहे. तिच्यासारखं होणं कदाचित शक्य नाही. पण तिच्या गुणांचा आदर्श आपल्या आयुष्यात उतरवून हेच तिच्याप्रती खरं प्रेम आणि कृतज्ञता आहे. आई तुझ्याच मूर्ती...... हे वाक्य केवळ एक भावना नाही तर आईच्या महानतेला दिलेला एक मनापासूनचा मानाचा मुजरा आहे. आई तू होतीस म्हणूनच हे जीवन सुंदर आहे.


        महंत.श्री.गोपालव्यास कपाटे.
     (मुलगा) महानुभाव उरळीकांचन.
                 पुणे महाराष्ट्र 

0 Response to "आईच्या स्मृतीस उजाळा--आईसारखे दैवत नाही...!"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article