नेहरू नगर भोजापूर येथे भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा
शुक्रवार, 17 अप्रैल 2026
Comment
नेहरू नगर, भोजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा जयंती सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष योगेश मेश्राम, माजी प्राचार्य नरेंद्र गणविर, चेतलाल कटरे, प्रा. विलास नान्हे (नगर परिषद ज्युनिअर कॉलेज, पवनी) यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. यानंतर सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली व उपस्थितांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले.
या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व, गीत गायन, चित्रकला, निबंध लेखन व संगीत खुर्ची स्पर्धांमध्ये माही कोडवते, मनस्वी डोये, ओवी मेश्राम, मंजिरी भोरे, आरूही मडामे, त्रिशा अटारकर, ओजल रामटेके, अंश बोरकर, स्नेहांश कान्हेकर, विनयशील रंगारी, स्वरा भोरे, अनवित रामटेके आदी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना मेडल व शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. विजय गणविर, प्रा. डॉ. महेश भैसारे, नितेश धारगावे, नंदकिशोर भालाधरे, देवेंद्र धारगावे, वर्षा गणविर, मृणाली कान्हेकर, दिपाली भोरे, अस्मिता धारगावे, अश्विनी भैसारे, सुजाता गोस्वामी, स्नेहलता मडामे, प्रभूदास निकोसे, चंदा लांजेवार, मंगला भोयर, अदिती धारगावे, कमलेश उके, प्रमोदिनी भालाधरे, योगेश भोंगाडे, रमेश शेंडे, शाम जगनाडे, दुर्गाप्रसाद सूर्यवंशी, राजेश कुकडे, जोगेंद्र मेश्राम, संतोष तांडेकर, महादेव मून, देविदास माटे, प्रदीप गणविर, सुशील रामटेके, सुरेश घोनमोडे, प्रा. डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे, राजेंद्र तिरपुडे, नागसेन लांजेवार, दीपक मेश्राम, सुबोध मेश्राम, शिलवंत घोडेस्वार, रत्नघोष भालाधरे, पुण्यशिल गणविर, भारत नंदागवळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंगेश मेश्राम, राहुल रामटेके, अजिंक्य मेश्राम, आदित्य गणविर, रूपलता गणविर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राहुल भोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन राखी रंगारी यांनी केले.
0 Response to "नेहरू नगर भोजापूर येथे भीम जन्मोत्सव उत्साहात साजरा"
एक टिप्पणी भेजें